'हम सुधर गए और आप बिघड गये', पंकज त्रिपाठीचे कपडे बघून रणवीर सिंह शॉक, PHOTO

Last Updated:
Pankaj Tripathi New Look : गंभीर भूमिका आणि साधाभोळा लूक असणाऱ्या पंकज त्रिपाठीच्या नव्या लूकने चाहत्यांसह सेलिब्रिटीही हैराण झाले आहेत. पंकजच्या फोटोवर रणवीर सिंहने केलेली कमेंट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
1/7
 पंकज त्रिपाठी जितके आपल्या गंभीर भूमिकांसाठी ओळखले जातात, तितकंच त्यांचं साधेपण आणि पारंपरिक अंदाजही लोकांना खूप आवडतो. पण यावेळी पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या लूकमध्ये असा बदल केला आहे की सर्वजण थक्क झाले आहेत.

advertisement
2/7
 लाल रंगाची पारंपारिक धोती आणि हिरव्या रंगाचा लांब ब्लेझर आणि टोपी घातलेला पंकज त्रिपाठी जेव्हा समोर आला, तेव्हा फक्त चाहतेच नव्हे तर रणवीर सिंहसुद्धा आश्चर्यचकित झाला.

3/7
 आपल्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत राहणाऱ्या रणवीरलाही पंकज त्रिपाठीच्या फोटोवर कमेंट करण्याचा मोह आवरता आला नाही.

4/7
 पंकज त्रिपाठीने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत गुरुजींना लिहिलं आहे,"एक नवी सुरुवात. एका छान गोष्टीची ही सुरुवात आहे. तुम्हाला हा अंदाज कसा वाटला?".

5/7
 पंकज त्रिपाठीच्या फोटोने जेवढं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे तेवढीच चर्चा रणवीरच्या कॅप्शनची होत आहे. पंकज त्रिपाठीच्या अवताराबद्दल कमेंट करत रणवीर सिंह म्हणाला,"अरे ये क्या गुरु जी? हम सुधर गए और आप बिगड गए".

6/7
 'हे खरे फोटो आहेत की AI', 'तुमचं फोटोशूट झालं असेल तर मी दिवाळीत हे परिधान करू शकतो का?', जबरदस्त दिसताय, दिवसेंदिवस हा माणूस तरुण होतोय, अशा कमेंट्स पंकज त्रिपाठीच्या फोटोवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

7/7
 'मिर्जापुर:द फिल्म'मध्ये पुन्हा एकदा कालीन भैयाची भूमिका साकारायला पंकज त्रिपाठी सज्ज आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. मिर्जापूरच्या विश्वाला एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जायला हा चित्रपट सज्ज आहे. पुनीत कृष्णा निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन गुरमीत सिंह करत आहे.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement