IND vs WI 1st Test : चिते की चाल, बास की नजर आणि नितीशचा डाईव्ह! डोळ्याचं पारणं फेडणारा कॅच एकदा पाहाच, Video

Last Updated:

Nitish Kumar Reddy Catch Video : मोहम्मद सिराजचा बॅक-ऑफ-लेंथ बॉल चंद्रपॉलने ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु स्क्वेअर लेगवर फिल्डिंग करणाऱ्या रेड्डीने डाव्या बाजूला डाईव्ह मारला.

Nitish Kumar Reddy superb diving Catch
Nitish Kumar Reddy superb diving Catch
Nitish Kumar Reddy superb diving Catch : अहमदाबाद कसोटी सामन्यात टीम इंडियाने 448 धावांवर डाव घोषित केला आहे. त्यानंतर आता दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ गडबडल्याचं पहायला मिळालं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. 12 धावांवर असताना नितीश कुमार रेड्डी यांनी मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर तेजनारायण चंद्रपॉलचा जबरदस्त कॅच घेतला.

रेड्डीने डाव्या बाजूला डाईव्ह मारला अन्...

आठवी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या मोहम्मद सिराजचा बॅक-ऑफ-लेंथ बॉल चंद्रपॉलने ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु स्क्वेअर लेगवर फिल्डिंग करणाऱ्या रेड्डीने डाव्या बाजूला डाईव्ह मारला आणि दोन्ही हातांनी उडता कॅच घेतला. रेड्डीचा रिअॅक्शन टाइम एका सेकंदापेक्षा कमी होता. पण रेड्डीने कॅच सोडला नाही.
advertisement

भारतीय बॉलर्सचा दबदबा

पहिल्या कसोटी मॅचचा (Test Match) दुसरा दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या नावावर राहिला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 5 बाद 448 धावा करत वेस्ट इंडिजच्या 162 धावांवर 286 धावांची मोठी आघाडी घेतली. टीम इंडियासाठी दुसऱ्या दिवशी तब्बल तीन फलंदाजांनी शतकं झळकावली होती. तर त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी भारतीय बॉलर्सचा दबदबा राहिला आहे.
advertisement
टीम इंडियाचा स्कॉड - शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, नितीश कुरमा रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह.
वेस्ट इंडिजचा संघ - रोस्टन चेस ( कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पिएर, जेडन सिल्स, जेडिया ब्लेड्स, जोहान लिन.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI 1st Test : चिते की चाल, बास की नजर आणि नितीशचा डाईव्ह! डोळ्याचं पारणं फेडणारा कॅच एकदा पाहाच, Video
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement