'तू सिनेमा Lover नाही, तू सिनेमा F****R', कांतारा चॅप्टर 1 पाहून ऋषभ शेट्टीला असं का म्हणाले राम गोपाल वर्मा?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ram Gopal Varma : कांतारा चॅप्टर 2 चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी ऋषभ शेट्टीला "तू सिनेमा लव्हर नाही तर तू सिनेमा फकर आहे", असं म्हटलं. जगभरात चर्चा असलेल्या कांतारा चित्रपटाविषयी राम गोपाल वर्मा असं का म्हणाले?
मुंबई : बॉक्स ऑफिसवर सध्या कांतारा चॅप्टर 1 हा सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमानं दोन दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. कन्नड अभिनेता, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर 1' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. चित्रपट समीक्षक, अनेक कलाकार, दिग्दर्शक हा सिनेमा पाहून ऋषभ शेट्टीचं कौतुक करत आहेत. बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही ऋषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी ऋषभ शेट्टीला "तू सिनेमा लव्हर नाही तर तू सिनेमा फकर आहे", असं म्हटलं. जगभरात चर्चा असलेल्या कांतारा चित्रपटाविषयी राम गोपाल वर्मा असं का म्हणाले?
चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ऋषभ शेट्टीचं मनापासून कौतुक करत राम गोपाल वर्मा यांनी चांगल्या अर्थाने असे शब्द वापरले आहेत. राम गोपाल वर्मा यांनी लिहिलंय, "कांतारा हा अप्रतिम आहे. भारतातील सर्व फिल्ममेकरना हा चित्रपट पाहून लाज वाटली पाहिजे. ऋषभ शेट्टी आणि त्यांच्या टीमनं BGM, साउंड डिझाईन, सिनेमॅटोग्राफी, प्रॉडक्शन डिझाईन आणि VFX मध्ये कमाल केली आहे."
advertisement

ते पुढे म्हणाले, "केवळ त्यांच्या मेहनतीमुळेच ‘कांतारा: चॅप्टर 1’ ब्लॉकबस्टर ठरला आहे. तू उत्तम दिग्दर्शक आहेस की उत्तम अभिनेता, हे मी ठरवू शकत नाही."
advertisement

राम गोपाल वर्मा यांचं हे ट्विट शेअर करत ऋषभ शेट्टीने त्यांचे आभार मानले. तो म्हणाला, "मी फक्त सिनेमावर प्रेम करणारा एक माणूस आहे सर. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनापासून आभार."

राम गोपाल वर्मा यांनी ऋषभ शेट्टीचं हेच ट्विट पुन्हा शेअर करत लिहिलंय, "तू सिनेमा Lover नाही, तू सिनेमा FUCKER आहेस. तू आम्हा सर्व फिल्ममेकर्सना दाखवून दिलं की खरं सिनेमा कसा बनवायचा. तुझ्या ‘Kantara Chapter 1’ या महाकाव्यानं भारतीय सिनेमात एक नवा अध्याय सुरू केला आहे. तू निर्माण आणि नवकल्पना यांचा नवा प्रवाह सुरू केलास, ज्यामुळे नव्या प्रकारच्या सिनेमाचा जन्म झाला आहे. आम्हा सर्वांना या अनुभवामुळे सिनेमाविषयी प्रचंड उत्साह आणि प्रेरणा मिळाली आहे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2025 11:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तू सिनेमा Lover नाही, तू सिनेमा F****R', कांतारा चॅप्टर 1 पाहून ऋषभ शेट्टीला असं का म्हणाले राम गोपाल वर्मा?