आईनं पै-पै करून घर घेतलं, पोटच्या लेकानं तिलाच हाकललं..., छ. संभाजीनगरात असा झाला न्याय!

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: आईनं पै-पै जमवून घर घेतलं, पण पोटच्या मुलानं हाल करून तिलाच घराबाहेर काढलं. छत्रपती संभाजीनगरमधील 65 वर्षांच्या आजीला शेवटी न्याय मिळाला.

आईनं पै-पै करून घर घेतलं, पोटच्या लेकानं तिलाच हाकललं..., छ. संभाजीनगरात असा झाला न्याय!
आईनं पै-पै करून घर घेतलं, पोटच्या लेकानं तिलाच हाकललं..., छ. संभाजीनगरात असा झाला न्याय!
‎‎छत्रपती संभाजीनगर: आईने आयुष्यभर कष्ट केले, पै-पै जमा करून एक छोटंसं घर उभं केलं. त्या घरात शांततेने वृद्धापकाळ घालवायचं तिचं स्वप्न होतं. पण दुर्दैवाने, ज्याच्यासाठी हे सगळं केलं, त्याच मुलाने तिला घराबाहेर काढले. ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील. 65 वर्षांच्या गंगाबाई (नाव बदललेले आहे) यांना त्यांचं घर परत मिळालं आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाने त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले… पण हे दु:खाचे नव्हते, हा हळूहळू मिळालेल्या न्यायाचा भावनिक क्षण होता.
‎‎गंगाबाईंनी 2004 साली स्वतःच्या भावाकडून 75 हजार रुपये घेऊन घर घेतलं होतं. राहुलनगरमधल्या एका छोट्याशा जागेवर दोन खोल्यांचं हे घर. त्या घरात त्यांनी सुखाचे दिवस पाहायची आशा ठेवली होती. पण त्यांच्या अपेक्षेला मोठा धक्का बसला. मुलगा आणि सून – रोहित आणि प्रिया (नाव बदललेले आहेत) – यांनी त्यांच्यावरच जुलूम चालवायला सुरुवात केली. शिव्यागाळ, भांडणं, आणि नंतर शारीरिक त्रास. इतकंच नाही तर एकदा मुलाने त्यांचा कान चावून त्यांना जखमी केलं. पोलिसांत तक्रार झाली, पण त्रास काही थांबला नाही.
advertisement
‎शेवटी त्यांनी घरावरच हक्क सांगायला सुरुवात केली. गंगाबाईंच्या नावावर मालमत्ता असतानाही खोटा कागद तयार करून घर आपलं असल्याचं त्यांनी सांगायला सुरुवात केली… आणि गंगाबाईंना घराबाहेर काढलं. गेली 3 वर्षं त्या कधी भावाकडे, कधी बहिणीकडे राहून आपलं अस्तित्व टिकवत होत्या. घर असूनही त्या बेघर झाल्या होत्या.
advertisement
‎पतीने आधीच त्यांना साथ दिली नव्हती. दुसरा विवाह करून त्यांना सोडलं आणि आता मुलगाही पाठीशी राहिला नाही. मधुमेह, रक्तदाब यामुळे काम करणं शक्य नव्हतं, पण तरीही त्यांनी हार मानली नाही. शेवटी त्यांनी ‘ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम 2007’ अंतर्गत न्यायासाठी अर्ज दाखल केला.
‎ अॅड. डी. व्ही. मोरे-मेश्राम यांनी गंगाबाई यांच्यावतीने प्रकरण हाताळलं. मुलगा व सून कोर्टात हजर राहिले नाहीत. नोटीसही स्वीकारली नाही. त्यामुळे प्रकरण एकतर्फी चाललं. आणि शेवटी, उपविभागीय दंडाधिकारी आणि न्यायाधिकरणाचे अध्यक्ष व्यंकट राठोड यांनी निर्णय दिला. राहुलनगरमधील घर पुन्हा गंगाबाईंना परत द्या. हा निकाल ऐकताच गंगाबाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले… पण यावेळी ते अश्रू दु:खाचे नव्हते, तर आपल्या लढ्याला मिळालेल्या न्यायाचे होते. स्वतःच्या कष्टाने घेतलेलं घर परत मिळालं होतं. आणि त्यांच्या मनात एक शांत समाधान दाटून आलं होतं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आईनं पै-पै करून घर घेतलं, पोटच्या लेकानं तिलाच हाकललं..., छ. संभाजीनगरात असा झाला न्याय!
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement