'प्रियाने करिश्माचा संसार उद्ध्वस्त केला', संजय कपूरच्या बहिणीचा शॉकिंग खुलासा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Mandira Kapur on Karisma-Sunjay Divorce : करिश्मा कपूरचा एक्स नवरा उद्योगपती संजय कपूरचं काही दिवसांआधी निधन झालं. त्यानंतर त्याची तिसरी पत्नी प्रिया सचदेववर अनेक आरोप करण्यात आले. संजयच्या संपत्तीचा वाद चर्चेत आहे. अशातच संजयच्या बहिणीने करिश्माची बाजू घेत तिचा संसार मोडण्यात प्रिया सचदेवला कारणीभूत ठरवलं आहे.
advertisement
advertisement
पत्रकार विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत संजय कपूरची बहीण मंदिरा म्हणाली, "मला संजय आणि प्रियाच्या वाढत्या जवळीकतेची कल्पना होती. ते फ्लाइटमध्ये भेटले आणि त्यानंतर सगलं काही बदललं. लोलो (करिश्मा) आणि माझा भाऊ त्या वेळी खूप आनंदी होते. कियानचा नुकताच जन्म झाला होता. संजय आपल्या मुलांबरोबर खूप खुश होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement