हवेत उडणाऱ्या बॅटचा फोटो शेअर करत DC ने खेळाडूला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, ओळखा कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rishabh Pant Birthday : आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या एक्स कॅप्टनला हटके वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Delhi Capitals Birthday Post : वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अनेकजण हटके पोस्ट करतात. पण दिल्ली कॅपिटल्सने एका खेळाडूला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने एक हवेत उडणाऱ्या बॅटचा फोटो शेअर केला. ही पोस्ट पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पण हा खेळाडू कोण? असा सवाल विचारला जातोय.
दिल्लीची हटके पोस्ट
दिल्ली कॅपिटल्सने शुभेच्छा दिलेला खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऋषभ पंत आहे. ऋषभ पंत बॅटिंग करताना बऱ्याचदा बॅट हवेतच असते. अशातच दिल्लीची हटके पोस्ट अनेकांना आवडली आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज ऋषभ पंत आता 28 वर्षांचा झाला आहे. दुखापतीमुळे तो सध्या मैदानापासून दूर आहे.
advertisement
Happy birthday to the one whose been making everyone look up for flying balls… and bats pic.twitter.com/HU7ESOTIG1
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 4, 2025
सर्वात प्रेरणादायी 'कमबॅक'
उत्तराखंडच्या रुरकीमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने अल्पावधीतच आपल्या निडर फलंदाजीने जगभर आपली ओळख निर्माण केली. क्रिकेटमधील कारकीर्द घडवण्यासाठी त्याने दिल्लीतील गुरुद्वारामध्ये (Gurudwara) दिवस काढले आणि लंगरमध्ये जेवण केले. मात्र, आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार एन्ट्री केली. 2022 मधील भीषण अपघात हा त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर, तो पुन्हा मैदानात उतरेल की नाही, याबद्दल शंका होती. परंतु, आपल्या जबरदस्त इच्छाशक्ती आणि परिश्रमाच्या जोरावर त्याने केवळ मैदान गाजवले नाही, तर क्रिकेट विश्वातील सर्वात प्रेरणादायी 'कमबॅक' पैकी एक करून दाखवले.
advertisement
ऋषभ पंतची संपत्ती किती?
टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू ऋषभ पंत हा भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक मागणी असलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक बनला आहे. गोवा हिल्समधील वृत्तांनुसार, 2025 मध्ये पंतची एकूण संपत्ती सुमारे 100 कोटी (अंदाजे 12 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) असण्याचा अंदाज आहे. त्याचे उत्पन्न आयपीएल करार, बीसीसीआयचे पगार आणि कोट्यवधी डॉलर्सच्या जाहिरातींच्या करारांमधून येते.
Location :
Delhi
First Published :
October 04, 2025 12:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हवेत उडणाऱ्या बॅटचा फोटो शेअर करत DC ने खेळाडूला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, ओळखा कोण?