"रामदास कदमांनी पोरींना नाचवून...", अनिल परबांची जहरी टीका, बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत म्हणाले...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यांन थेट रामदास कदम यांची सगळी कुंडली बाहेर काढली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यांन थेट रामदास कदम यांची सगळी कुंडली बाहेर काढली आहे. रामदास कदम यांच्या पत्नीने केलेल्या जाळून घेण्याच्या घटनेवर देखील त्यांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे.
रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातून केलेल्या टीकेवर भाष्य करताना अनिल परब म्हणाले, रामदास कदम हे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे आहेत. ते भीकेचा कठोरा घेवून फिरत होते. माझी आई वारली तेव्हा मी यांच्या निवडणुकीची सुत्रे हाती घेतली होती. आतापर्यंत इतके दसरा मेळावे झाले, पण आताच हा विषय का काढला? कारण महापालिका निवडणूक आहे. इतर विषयांपासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी कदमांनी हे आरोप केले, असं परब म्हणाले.
advertisement
रामदास कदम भाड खावून पैसे कमवतो. त्याची काही किंमत नाही. जे दलालीचे पैसे खातात, त्याची किंमत शून्य आहे. कोर्ट ठरवेल त्यांना किती दंड करायचा ते. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राला जयदेव ठाकरेंनी आव्हान दिलं होतं. चार-पाच वर्षे कोर्टात केस चालवली, पण काही झालं नाही. ज्यांना शंका आहे, त्यांनी कोर्टात जावं, असंही परब म्हणाले.
advertisement
पोरींना नाचवून पैसे खातो. त्याला मंत्रिपदावर राहायचा नैतिक अधिकार आहे का? आम्हाला भाडगिरीचे पैसे खायची सवय नाही, अशी टीकाही अनिल परब यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर हे मुद्दे आणले जातायत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यावर सुपडासाफ होईल, याची त्यांना भीती असल्याने असे मुद्दे आणले जात आहेत, अशी टीकाही परब यांनी केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"रामदास कदमांनी पोरींना नाचवून...", अनिल परबांची जहरी टीका, बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत म्हणाले...