छ. संभाजीनगर – पैठण महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल, 15 दिवसांसाठी पाहा पर्यायी मार्ग

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर ते पैठण महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 15 दिवसांसाठी या महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

छ. संभाजीनगर – पैठण वाहतुकीत मोठे बदल, महामार्गावरील वाहतूक 15 दिवस बंद, पर्यायी मार्ग
छ. संभाजीनगर – पैठण वाहतुकीत मोठे बदल, महामार्गावरील वाहतूक 15 दिवस बंद, पर्यायी मार्ग
‎छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पैठण या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 वर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या अंतर्गत बिडकीनजवळील निलजगाव फाटा परिसरात सध्या काँक्रीट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे या भागातील वाहतूक 4 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान तात्पुरती वळवण्यात येणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल.
‎4 ते 18 ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि काम सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाने यासंबंधीची तयारी पूर्ण केली आहे.
advertisement
‎बंद राहणारा मार्ग
कचनेर – निलजगाव – बिडकीन डीएमआयसी – निलजगाव फाटा – बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
‎पर्यायी मार्ग
‎छत्रपती संभाजीनगरहून वाळूज, कचनेर किंवा पैठणकडे जाणारी वाहने आणि त्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा वापर सुचवण्यात आला आहे. या मार्गांवर वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासनामार्फत आवश्यक त्या दिशा फलकांची व नियंत्रण यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
‎‎प्रशासनाचे आवाहन
‎‎या वाहतूक बदलामुळे प्रवासात काहीसा वेळ अधिक लागू शकतो. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ. संभाजीनगर – पैठण महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल, 15 दिवसांसाठी पाहा पर्यायी मार्ग
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement