"बाळासाहेबांच्या बोटाचे ठसे घेतले", रामदास कदमांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्रावर त्यांच्या बोटाचे ठसे घेण्यात आले, या रामदास कदमांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला, असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्रावर ठसे घेण्यात आले, असा आरोपही कदमांनी केला. या सगळ्या आरोपानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रामदास कदम यांचा उल्लेख गद्दार आणि नमक हराम असा केला आहे.
उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी राज ठाकरे यांच्या युतीवर देखील भाष्य केलं आहे.
रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातून केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, "मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. त्यांना उत्तर देण्याची गरजही नाही. ठाकरे म्हणजे काय आहे? हे आख्खा महाराष्ट्र आणि देश ओळखतो. त्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखोरांना मी उत्तर देणार नाही."
advertisement
"एकत्र यायचं नसतं तर मेळावा घेतलाच नसता"
राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, "2005 मध्ये आम्ही वेगळे झालो. त्यानंतर आता आम्ही एका मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. त्यामुळे आम्ही रोज उठून एकत्र आलो, एकत्र आलो, असं म्हणायची गरज नाही. ५ जुलैला आम्ही जो मेळावा घेतला. तेव्हाच आम्ही एकत्र आलो. आम्हाला एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र मेळावा घेतलाच नसता. आम्ही एकत्र आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. मराठी माणूस एकवटला आता आपलं काय होणार, अशी भीती त्यांना आहे."
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 04, 2025 1:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"बाळासाहेबांच्या बोटाचे ठसे घेतले", रामदास कदमांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया