मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सातत्याने आंदोलन सुरू होते. मुंबई मराठा समाजाने आरक्षणासाठी निर्णायक आंदोलन केले. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली. मराठा आरक्षण उपसमितीने तीन शासकीय आदेश जारी करत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्यानंतर मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली. सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेत्यांनी विरोध केला. ओबीसी प्रवर्गातील इतर जातींवर हा अन्याय असल्याचा आरोप करण्यात येत होता.
advertisement
स्थानिक निवडणुकीत पडसाद...
राज्यातील राजकारणातही या आरक्षण संघर्षाचे पडसाद उमटण्याची भीती आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा-कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. काही ठिकाणी पूर्वी मराठा प्रवर्गात असणारे आता मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रावर ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी उमेदवारांनी चाचपणी करत तयारी देखील केली असल्याचे वृत्त आहे.
मराठा आणि ओबीसींमधील नेत्यांवरून आरक्षणाच्या भूमिकेवरुन मतमतांतरे, वाद असताना दुसरीकडे नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीमुळे हा वाद आणखी वाढला जाऊ नये, याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहिर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाचे प्रभावी उमेदवार कोण असतील याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. इच्छुकांमध्ये ओबीसी प्रमाणपत्र असलेल्या काही मराठा उमेदवारांचीही नावे चर्चेत आहेत. मराठा प्रवर्गातील उमेदवारांना कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळाली आहेत. मराठवाड्यातही नवी समीकरण
मराठवाडा : ओबीसींसाठी १६ जागा
सर्वसाधारण : 42, ओबीसी : 16, अनुसूचित जाती : 3 | महिलांना एकूण : 33
सर्वसाधारण महिला :
* पैठण
* खुल्ताबाद
* कन्नड
* अंबड
* गेवराई
* परळी
* उदगीर
* रेणापूर
* कळंब
* भूम
* वाशी
* किनवट
* हदगाव
* मुदखेड
* धर्माबाद
* मुखेड
* वसमत
* कळमनुरी
* मानवत
* पूर्णा
* गंगाखेड
सर्वसाधारण :
* फुलंब्री
* सिल्लोड
* गंगापूर
* बदनापूर
* धारूर
* अंबजोगाई
* निलंगा
* अहमदपूर
* उमरगा
* तुळजापूर
* मुरुम
* नळदुर्ग
* लोहारा
* भोकर
* बिलोली
* कुंडलबवाडी
* लोहा
* कंधार
* हिमायतनगर
* पाथरी
* सोनपेठ
* कंधार
* हिमायतनगर
* पाथरी
* सोनपेठ
* जिंतूर
* पालम
* औसा
* हिंगोली
* देगलूर
* माहूर
ओबीसी :
* वैजापूर
* तिर्थपुरी
* मंठा
* परंडा
* सोनपेठ
* जिंतूर
* पालम
ओबीसी महिला :
* भोकरदन
* घनसावंगी
* जाफराबाद
* माजलगाव
* धाराशिव
* औसा
* हिंगोली
* देगलूर
* माहूर
अनुसुचित जाती महिला :
* परतूर
* बीड
* उमरी
अनुसुचित जाती :
* सेलू