मराठवाड्यामध्ये लक्ष्मण हाके सारखा दलाल सुपारी वाजवतो. पण वाल्मीक कराडचा आका बाहेर आहे. तो आका लक्ष्मण हाकेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्याला रसद पुरवून अजित पवारांना तर ब्लॅकमेल करत नाही ना? असा माझा सवाल आहे. गणपतराव देशमुख यांच्या नातूच्या विरोधात लक्ष्मण हाके तुम्ही सुपारी घेऊन उभा राहिला होता. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा आरोपही डोंगरे यांनी केला.
advertisement
सुपारी दुसरं काय...? धनगर समाजाच्या एकाही आमदाराच्या मतदारसंघात हाके गेला नाही!
धनगर समाजाचे महाराष्ट्रात आठ आमदार आहेत. त्यापैकी एकाही आमदाराचा त्यांना प्रचार करता आला नाही. स्पष्टपणे आजही ते आमदार सांगतात, तू जर आमच्या मतदारसंघात आला तर तुला उलट टांगून मारीन. ज्या सोसायटीत राहतो तेथे लोकांनी त्याला दोन वेळा तुला मारला आहे. तो सुपारी बहाद्दर आहे. परळीतून किंवा येवल्यातून सुपारी वाजवतो. येवल्यातून यांना चिल्लर वाटलेली आहे. चिल्लर फक्त वाजतच असते, चिल्लरने काहीही परिणाम होणार नाही. छगन भुजबळ तुम्हाला मराठा-ओबीसी तेढ निर्माण करायची आहे. हे कदापि होणार नाही. तुमचं नेतृत्व हरपलंय. पश्चिम महाराष्ट्रात हाकेला काळे कुत्रेही ओळखत नाही. त्याची लायकी माहिती आहे. मराठवाड्यातील लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नये, असे डोंगरे म्हणाले.
हाकेच्या खांद्यावर बंदूक, आकाच्या टार्गेटवर अजितदादा
लक्ष्मण हाके हा फक्त आमदार आणि खासदार होण्यासाठी प्रयत्न करत आहे. आकाला मंत्रिमंडळातून काढल्यामुळे आता लक्ष्मण हाकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आका काम करत आहे.
राज्य सरकारला विनंती आहे की हाकेला तात्काळ अटक करा. महाराष्ट्र पेटवण्याचं काम हाके करत आहे, असे डोंगरे म्हणाले.