सातारा जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाटण शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला जात असल्याचे समोर आले आहे. मराठी एकीकरण समितीने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
व्हिडीओतील राहुल शेडगे या तरुणाने केलेल्या दाव्यानुसार, या बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाटण शाखेत बहुंताश ग्राहक हे ज्येष्ठ नागरीक आहेत. या ज्येष्ठ नागरिकांना हिंदी भाषा येत नाही. त्यांना मराठी भाषा बोलता येते आणि समजते. पण या बँकेतील कर्मचारी या मराठी भाषिक ग्राहकांना हिंदीतच बोलण्याचा हट्टाहास करतात. आम्हाला मराठी भाषा येत नसल्याने हिंदीत संभाषण करण्याची सूचना या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते.
आम्हाला तुमची गरज नाही, हिंदी शिका...
राहुल शेडगे यांनी बँकेतून व्हिडीओ शूट केला असून धक्कादायक आरोप केले आहेत. राहुल शेडगे यांनी सांगितले की, हिंदीच्या हट्टहासाबाबत जाब विचारले असता त्याने तुम्ही हिंदी शिकून या, आम्हाला तुमची गरज नाही असं उलट उत्तर दिले. या व्हिडीओवर सोशल मीडियातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
