ऐन निवडणुकीच्या तोंडावर 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेना शिंदे गटात होणारा प्रवेश हा लातूर महापालिका निवडणुकीतील गेमचेंजर ठरू शकतो, अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे. मतदानाच्या अवघ्या काही दिवस आधी घडलेल्या या घटनेमुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. लातूरमध्ये भाजप स्वबळावर लढत आहे. तर शिंदेंनी लातूरमध्ये 11 जागांवर उमेदवार उभे केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 17 उमेदवारांनी जाहीर प्रवेश केला आहे.
advertisement
शिंदेसेनेत आज कोणाचा प्रवेश झाला?
श्रीकांत रांजणकर, मनोज जोशी, निलेश मांदळे, अर्चना कांबळे, अजय गजाकोष, प्रशांत बिरादार, शोभा सोनकांबळे, प्रशांत काळे, ओमप्रकाश नंदगावे, राहुल साबळे, नरसिंह घोणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष उत्तमराव लोंढे आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
लातूरकर कोणाला कौल देणार?
शिंदेंच्या शिवसेनेच प्रवेश केलेले यात काहीजण राष्ट्रवादी, तर काहीजण स्वतंत्र निवडणूक लढवणारे तर काहीजण इतर पक्षात कार्यरत होते. त्या सर्वांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद वाढल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत लातूरकर कोणाला कौल देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा :
