समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता रात्री आपल्या घरात झोपलेली होती. रात्री गरम होत असल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवला होता, मध्यरात्री सगळे गाठ झोपल्यानंतर आरोपी वैभव पटेकर याने पीडितेला बळजबरीने उचलून गावाबाहेर नेले. तिथे एका निर्जन स्थळी नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केले. एवढ्यावरच या नराधमाचा राक्षसीपणा थांबला नाही, तर त्याने पीडितेचा मानसिक छळ करण्यासाठी तिला पुन्हा गावात आणले आणि गावच्या सार्वजनिक चावडीवर असलेल्या खांबाला दोरीने बांधून ठेवले.
advertisement
काय म्हटले आहे तक्रारीत?
आरोपी पीडितेला घरातून उचलून नदीकडे घेऊन गेला. त्यावेळी पीडित महिलेना आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर आरोपीने तोंड दाबले होते. नदीवर आरोपीने महिलेवर अत्याचार केले आणि त्यानंतर बेशुद्ध झालेल्या पीडितेला गावच्या चौकात बांधून ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रात्रभर गावच्या चौकात बांधून ठेवले
हा सर्व प्रकार रात्रभर कोणाच्याही लक्षात आला नाही. सकाळी जेव्हा गावकरी कामासाठी बाहेर पडले तेव्हा त्यांना ही विवाहिता चावडीवर बांधलेल्या अवस्थेत दिसून आली. गावकऱ्यांनी तात्काळ तिची सुटका करून पोलिसांना पाचारण केले. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस आणि 'पिंक पथक' घटनास्थळी दाखल झाले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरित सूत्रे हलवून आरोपी वैभव पटेकर याच्या मुसक्या आवळल्या.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याच्या कृत्याची गंभीर दखल घेत त्याला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पिंपळनेर पोलिसांसह विशेष पिंक पथक करत आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हे ही वाचा :
