TRENDING:

पिंपरी विधानसभा निवडणूक 2024 : महायुती आणि पक्षांतर्गत विरोध अजित पवारांसाठी डोकेदुखी ठरणार का? पिंपरीत दादांचा उमेदवार जिंकणार का?

Last Updated:

पिंपरी –चिंचवड या जुळ्या औद्योगिक शहरांचा समावेश दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात होतो. त्यापैकी चिंचवडवर संघ, भाजपचा प्रभाव आहे तर पिंपरी राष्ट्रवादीशी लॉयल आहे. पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे आहेत आणि ते अजित पवारांचे विश्वासू कार्यकर्ते मानले जातात...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी –चिंचवड या जुळ्या औद्योगिक शहरांचा समावेश दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात होतो. त्यापैकी चिंचवडवर संघ, भाजपचा प्रभाव आहे तर पिंपरी राष्ट्रवादीशी लॉयल आहे. पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे आहेत आणि ते अजित पवारांचे विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. त्यांनाच या वेळीसुद्धा महायुतीतर्फे रिंगणात उतरवण्यात आलं आहे. पण त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गतविरोध भरपूर झाला. महायुतीनेही बनसोडेंना तिकीट देण्याविषयी फार सकारात्मकता दाखवली नव्हती. पण अजितदादांनी त्यांच्या विश्वासाला प्राधान्य देत अण्णांची उमेदवारी तर घोषित केली. आता हा विश्वास अण्णा कसा सार्थ ठरवतात हे कळेल. दरम्यान महाविकास आघाडीपुढे अजून उमेदवार फायनल करण्याचा प्रश्न आहे.
News18
News18
advertisement

हे ही वाचा : माहीम विधानसभा निवडणूक 2024 : तिरंगी लढतीचा अमित ठाकरेंना फायदा की तोटा? माहीममध्ये काय आहे स्ट्रॅटेजी…

राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासह 18 नगरसेवकांनी अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला होता. बनसोडेंची मतदारसंघावर पकड आहे. आतापर्यंत दोन निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. अजित पवार यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात बनसोडेंनी त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे अजितदादांनी त्यांच्यावरच पुन्हा विश्वास दर्शवला आहे.

advertisement

पिंपरी विधानसभा मतदारसंघ इतिहास

2019 मध्ये काय झालं?

अण्णा बनसोडे – राष्ट्रवादी - 86,985

गौतम चाबुकस्वार – शिवसेना – 67177

प्रवीण गायकवाड – वंचित – 136812

2019 ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीने जिंकली. त्या वेळी अण्णा बनसोडे यांनी सेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा  20000 मतांनी पराभव केला. पण गेल्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकसंध होते. आता राजकीय गणितं बदलली आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष्यांनी पिंपरीवर दावा केला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार कुणाला साथ देतील हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.

advertisement

लोकसभा 2024 ला काय झालं?

पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. हे सहाही मतदारसंघ सध्या महायुतीच्या ताब्यात आहेत हे विशेष.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत  अजित पवार  महायुतीत सामील झालेले होते.  आणि बारणेंकडेच युतीचं प्रतिनिधित्व सोपवलं. मावळ मतदारसंघात यंदा सेना विरुद्ध सेना असा थेट सामना झाला. त्यात शिवसेना शिंदे समर्थक असलेले श्रीरंग बारणे निवडून आले आणि खासदार झाले. उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांचा पराभव झाला.

advertisement

हे ही वाचा : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक 2024 : आर आर आबांचा मुलगा पहिल्यांदा रिंगणात; अजितदादांच्या राजकीय खेळीमुळे उभं राहिलं कडवं आव्हान

मावळ लोकसभा मतदारसंघ 2019  मध्ये चर्चेत येण्याचं कारण होतं अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार. ते या लोकसभा निवडणुकीला रिंगणात होते पण त्यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी पराभव केला होता. आता बारणे शिंदे गटात आहेत. त्यावेळी पार्थ पवार यांचा पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. दोन लाखांच्या फरकाने बारणे जिंकले होते. त्याच बारणेंचं मताधिक्य 2024 ला संजोग वाघेरे यांच्यासमोर लाखभराने कमी झालं. पिंपरीमध्येही अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही. त्यामुळे बनसोडे यांचा विजय तसा सोपा नसेल.

advertisement

पुणे जिल्ह्यात कोण कोण आमदार

जुन्नर  -  अतुल बेनके (राष्ट्रवादी)

आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)

खेड आळंदी – दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)

शिरुर - अशोक पवार (राष्ट्रवादी)

दौंड- राहुल कुल (भाजप)

इंदापूर - दत्ता भरणे (राष्ट्रवादी)

बारामती- अजित पवार (राष्ट्रवादी)

पुरंदर - संजय जगताप (काँग्रेस)

भोर - संग्राम थोपटे (काँग्रेस)

मावळ - सुनिल शेळके (राष्ट्रवादी)

चिंचवड - लक्ष्मण जगताप  - पोटनिवडणुकीनंतर अश्विनी लक्ष्मण जगताप (भाजप)

पिंपरी - अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)

भोसरी - महेश लांडगे (भाजप)

वडगाव शेरी - सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी)

शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे (भाजप)

कोथरुड - चंद्रकांत पाटील (भाजप)

खडकवासला - भीमराव तपकीर (भाजप)

पर्वती- माधुरी मिसाळ (भाजप)

हडपसर -  चेतन तुपे (राष्ट्रवादी)

पुणे कॅन्टोन्मेंट - सुनील कांबळे (भाजप)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ऐन दिवाळीत मका अन् कांद्याचे दर कोसळले, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

कसबा पेठ -  मुक्ता टिळक - (भाजप) पोटनिवडणुकीनंतर रवींद्र धंगेकर (काँग्रेस)

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पिंपरी विधानसभा निवडणूक 2024 : महायुती आणि पक्षांतर्गत विरोध अजित पवारांसाठी डोकेदुखी ठरणार का? पिंपरीत दादांचा उमेदवार जिंकणार का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल