दरम्यान, पक्षात नसताना खडसेंच्या या बैठकीमुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मात्र चांगलेच गोंधळात पडले. माझ्या पक्षप्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी असून प्रवेश झालेला असल्याचं भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं आहे. त्यामुळे मी प्रचारात उतरलो आहे, असं खडसेंनी यावेळी सांगितलं. त्यांनी यावल येथील भाजप प्रचार कार्यालयास भेट दिली, यावेळी माध्यमांशी बोलताना खडसे पक्षप्रवेशाबाबत स्पष्ट बोलले.
advertisement
आमदार खडसेंचा भाजपात पक्षप्रवेश झालेला नसताना अचानक पक्षाच्या संपर्क कार्यालयात खडसे आल्याने शहर आणि तालुक्यातील भाजपचे काही पदाधिकारी मात्र चक्रावले होते. शहरात विविध भागात प्रचार करताना भाजप पदाधिकारी आमदार खडसेंच्या आदेशाचे पालन करताना दिसले.
माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले, की 'भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माझा प्रवेश कधी जाहीर करणार असं विचारलं. तेव्हा त्यांनी म्हटलं, की प्रवेशाची तारीख कळवतो, तुमचा प्रवेश झालेलाच आहे. बैठका घेण्यास आणि प्रचार करण्यास हरकत नसल्याचं त्यांनी सांगितलेॉं. त्यानुसार मी गेल्या दोन दिवसांपासून प्रचारात सक्रिय झालो आहे.'
काही दिवसांपूर्वी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र अजूनही त्यांचा भाजप पक्षप्रवेश अजूनही रखडला आहे.
