सोलापूर शहरातील केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग मधील दोन विद्यार्थ्यांनी एक ड्रोन बनवला आहे.हवामान विभाग वातावरणामधील तापमान त्यामधील बदल सेन्स करून पाऊस पडणार की नाही किंवा तापमान कसा राहणार आहे या संदर्भात माहिती देत असतात. ही माहिती संकलन करण्यासाठी हवामान विभाग बलून आणि व्हेरियन्स सेंसर ढगामध्ये पाठवून त्याचा अभ्यास करून वातावरणातील बदल व पावसाचा अंदाज काढला जातो. पण ही माहिती संकलन करण्यासाठी हवामान विभागाला दिवसाला 15 हजार रुपयांचा खर्च येतो.
advertisement
खर्च वाचवण्यासाठीच विद्यार्थ्यांनी कमी खर्चामध्ये हा ड्रोन बनवला आहे. हा ड्रोन बनवत असताना विद्यार्थ्यांनी त्यामध्ये व्हेरियस सेंसर तसेच जीपीएस देखील बसवला आहे. व्हेरियन्स सेल्स केलेली माहिती ताबडतोब मोबाईलवर अँपद्वारे मिळणार आणि उद्याचा तापमान किंवा पाऊस कधी पडेल याचा अंदाज हवामान खात्याला काढता येणार आहे. हा ड्रोन बनवण्यासाठी 15 ते 17 हजार रुपये खर्च आला आहे. आता हवामान विभागाचे हवामान अंदाजासाठी होणारं दिवसाला 15 हजार रुपयांचा होणारा खर्च कमी होणार असल्याची माहिती प्राध्यापक माणिक शिंदे यांनी दिली.