याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5 हा प्रकल्प एकूण 29.4 किलोमीटर लांबीचा असेल. ठाण्यातील बाळकुम नाक्यापासून ते कल्याण एपीएमसीपर्यंत 15 स्टेशन्स बांधले जातील. मेट्रो-5 प्रकल्पात ठाणे ते भिवंडी या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम लवकरच पूर्ण होईल. भिवंडी ते कल्याण या मार्गावर रस्त्याची समस्या आहे. त्यामुळे भिवंडी ते कल्याण हा मार्ग भूमिगत किंवा एविव्हेटेड करावा लागेल. कल्याणपर्यंत मेट्रो गेल्यानंतर तिचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्यास मान्यता दिली जाईल.
advertisement
विमानतळांना मेट्रो कनेक्टिव्हिटी
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील निर्माणाधीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपर्यंत मेट्रो कनेक्टिव्हिटी निर्माण केली जाणार आहे. दोन्ही विमानतळांना जोडण्यासाठी मेट्रो-8 प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो-8 चा डीपीआर तयार झाला आहे. या मार्गावर सुमारे 14 स्टेशन्स असतील. मुंबई विमानतळाच्या बाजूचे मेट्रो स्टेशन्स भूमिगत असतील तर नवी मुंबई विमानतळाच्या बाजूचे स्टेशन्स एलिव्हेटेड असतील. सध्या या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी महसूल विभागाकडे फाईल पाठवण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी वित्त विभागाची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा उपसमिती आणि राज्य मंत्रिमंडळासमोर प्रकल्पाच्या मंजुरीसाठी ठेवला जाईल.