याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहर व जिल्हा तसेच वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5 हजार 285 फ्लॅट व ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरता सोडत काढली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Mumbai Metro: मेट्रो 3च्या वेळेत मोठा बदल, कसं असेल सुट्टीच्या दिवशी वेळापत्रक?
advertisement
आतापर्यंत जवळपास सव्वा लाख अर्ज आले असून अनामत रक्कम भरणाऱ्यांची संख्याही एक लाखाच्या जवळ जाणारी आहे. यापूर्वी झालेल्या सोडतींच्या तुलनेत यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला असून अर्जदारांचा कल हा 20 टक्के योजनेतील घरांकडे आहे. 18 सप्टेंबरला लॉटरी काढली जाणार आहे.
म्हाडा कोकण लॉटरी 2025 साठी नोंदणी करण्यासाठी https://housing.mhada.gov.in/ या अधिकृत वेबसाईटचा वापर करता येईल. 28 ऑगस्टपर्यंत आलेल्या अर्जांची 18 सप्टेंबरला लॉटरी काढली जाणार आहे. ज्यांना लॉटरीमध्ये घर मिळत नाहीत, अशांची अनामत रक्कम परत केली जाईल.
परतावा कधी आणि कसा मिळतो?
म्हाडाच्या लॉटरीचा निकाल जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच घर न मिळालेल्या अर्जदारांना परतावा देण्याची प्रक्रिया सुरू होते. परताव्याची प्रक्रिया त्याच पेमेंट पद्धतीद्वारे केली जाते जी नोंदणी रक्कम भरण्यासाठी वापरली जाते. नमूद केलेल्या तारखेमध्ये परतावा न मिळाल्यास, अर्जदार हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतो.