याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या कोकण मंडळाने काही दिवसांपूर्वी ठाणे, नवी मुंबईत 5,362 घरांसाठी लॉटरी अर्ज मागवले आहेत. त्याला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. 1 लाख 84 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे म्हाडाच्या घरांना मागणी असल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र, सध्या कोकण मंडळाकडे परवडणाऱ्या घरांचे मोठे प्रकल्प राबवण्यासाठी जागाच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत सुमारे 350 हेक्टर सरकारी जमिनीची मागणी सरकारकडे मागणी केली आहे.
advertisement
Kalyan Ring Road: उतावळेपणाची किंमत 283.91 कोटी! कल्याण रिंगरोडप्रकरणी कॅगची परखड टीका
ज्या खासगी जमिनीचा कर (शुल्क) भरला जात नाही, त्या जमिनी महसूल विभाग जप्त करते. अशा जमिनी सरकारजमा होतात. अशा जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर आकार पड किंवा महाराष्ट्र शासन असा उल्लेख असतो. या जमिनी सरकारी प्रकल्पांसाठी वापरता येतात. म्हाडा अशाच जमिनीची मागणी सरकारकडे करत आहे. राज्य सरकारकडून म्हाडाला दिल्या जाणाऱ्या जमिनी नाममात्र 1 रुपया किमतीला दिल्या जातात. या जमिनींची रीतसर खरेदी प्रक्रिया केली जाते. मात्र, या जमिनी सामान्यांसाठी घरं बांधण्यासाठीच वापरणे बंधनकारक असते.