Kalyan Ring Road: उतावळेपणाची किंमत 283.91 कोटी! कल्याण रिंगरोडप्रकरणी कॅगची परखड टीका

Last Updated:

Kalyan Ring Road: कल्याण-डोंबिवलीमधील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी कल्याण रिंगरोडचं काम हाती घेण्यात आलं होतं.

Kalyan Ring Road: उतावळेपणाची किंमत 283.91 कोटी! कल्याण रिंगरोड प्रकरणी कॅगची परखड टीका
Kalyan Ring Road: उतावळेपणाची किंमत 283.91 कोटी! कल्याण रिंगरोड प्रकरणी कॅगची परखड टीका
कल्याण: कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळ्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रिंगरोड बांधण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पात एमएमआरडीए 30.3 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधणार होती. मात्र, हे काम मुदतपूर्व बंद करण्याची नामुष्की आली आहे. या कामासाठी आवश्यक जमीन हस्तांतरित करण्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेला अपयश आलं. परिणामी 283.91 कोटी रुपये वाया गेल्याची टीका 'कॅग'ने नगरविकास आणि एमएमआरडीएवर केली आहे.
जमीन नसताना कंत्राट
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीमधील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार कल्याण रिंगरोडचं काम हाती घेण्यात आलं होतं. या रोडसाठी एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्यात ऑगस्ट 2016 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता.
advertisement
या कामासाठी एमएमआरडीएकडून 578 कोटींची प्रशासकीय मान्याता देण्यात आली होती. निविदा काढण्याच्या तारखेपर्यंत केवळ 33 टक्के जमीन उपलब्ध होती. तरीदेखील एमएमआरडीएने कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावलीचं उल्लंघन करण्यात आलं आहे, असं 'कॅग'च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
जमीन मोजणीला स्थानिक नागरिकांचा विरोध केला होता. शिवाय कामात अडथळा ठरणारी झाडं काढण्यासाठी गावकऱ्यांनी जास्त किंमत मागितली होती. ही मागणी महापालिका पूर्ण करू शकली नाही. परिणामी जमीन हस्तांतरणात अपयश आलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan Ring Road: उतावळेपणाची किंमत 283.91 कोटी! कल्याण रिंगरोडप्रकरणी कॅगची परखड टीका
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement