Subway: ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत! एमएमआरडीएचा मेगाप्लॅन, सरकारने दिला 300 कोटी निधी

Last Updated:

Subway: येत्या काही वर्षांत ठाणे ते बोरिवली हे अंतर सुमारे 12 मिनिटांत पार करता येईल.

Subway: ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत! एमएमआरडीएचा मेगाप्लॅन, सरकारने दिला 300 कोटी निधी
Subway: ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत! एमएमआरडीएचा मेगाप्लॅन, सरकारने दिला 300 कोटी निधी
मुंबई: महानगरी मुंबई आणि उपनगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. विशेषत: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून मुंबई शहरात येताना वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या दिसतात. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह आणि ठाणे ते बोरिवली दरम्यान भुयारी मार्ग बांधला जात आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएला राज्य सरकारकडून सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी देखील मिळाला आहे.
ठाणे ते बोरिवली 12 मिनिटांत
सध्या ठाणे ते बोरिवली प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे या प्रवासासाठी भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा भुयारी रस्ता जाणार आहे. या भुयारी मार्गामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर सुमारे 12 मिनिटांत पार करता येईल. भुयारी मार्गात सिग्नल नसल्याने वाहनांना विनाअडथला प्रवास करणे शक्य होईल. हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
advertisement
याशिवाय, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जर थेट मरीन ड्राईव्हपर्यंत जायचं असेल तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा सहन करत मजलदरमजल करत मरीन ड्राईव्हवर पोचण्यासाठी वेळेचा प्रचंड अपव्यय होतो. दक्षिण मुंबईतील या वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी पी डी'मेलो मार्गावरील ऑरेंज गेटपासून मरीन ड्राईव्हपर्यंत भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे.
advertisement
यामार्गावर दोन बोगदे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी एका बोगद्याची लांबी सुमारे 4.27 किलोमीटर तर दुसऱ्या बोगद्याची लांबी 2.24 किलोमीटर आहे. शिवाय त्यात 3.2 मीटर रुंदीच्या दोन मार्गिका तर एक आपत्कालीन मार्गिका बांधली जाणार आहे. या बोगद्यापर्यंत पोहोचण्यासाठी 190 मीटरचा मार्ग बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी 'लार्सन अँड टुब्रो' या कंपनीला कंत्राट मिळालेलं आहे.
advertisement
या प्रकल्पाच्या कामासाठी एमएमआरडीएला राज्य सरकारकडून सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. भुयारी मार्गासाठी एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज मिळालं आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या कामासाठी 90 कोटी रुपये आणि ठाणे ते बोरिवली दरम्यानच्या कामासाठी 210 कोटी रुपये देण्यासा नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Subway: ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत! एमएमआरडीएचा मेगाप्लॅन, सरकारने दिला 300 कोटी निधी
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement