अलका कुबल यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

Last Updated:

मराठी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अलका कुबल
अलका कुबल
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खूप जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. ज्यामुळे कुबल कुटुंबाला आणि मराठी सिनेसृष्टीलाही मोठी धक्का बसला आहे.
अलका कुबल यांचे मोठे भाऊ आणि ज्येष्ठ चित्रपट संकलक वसंत कुबल यांचं निधन झालंय. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांना पक्षाघाताचा त्रास होत होता. मुंबईत त्यांच्या राहत्या घरीच उपचार सुरू होते, पण अखेर त्यांनी प्राण सोडले. शनिवारीच त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.
advertisement
वसंत कुबल हे मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत कसलेले आणि संवेदनशील संकलक म्हणून ओळखले जात. साधारणपणे 40 वर्षांहून अधिक काळ त्यांनी संपादनाच्या क्षेत्रात काम केले. ‘कुंकू लावते माहेरचे’, ‘परीस’, ‘चॅम्पियन्स’, ‘लढाई’, ‘माय माऊली मनुदेवी’, ‘स्नेक अँड लॅडर’ अशा विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये त्यांनी संपादनाची जादू दाखवली. त्यांचं काम नेहमीच कथानकाला गती देणारं आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं असायचं.
advertisement
दरम्यान, त्यांच्या निधनाची बातमी समजताच मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीला नेहमीच तांत्रिक दर्जा आणि कलात्मकतेसाठी नावाजलं जातं. वसंत कुबल यांच्यासारख्या लोकांच्या योगदानामुळे हे शक्य झालं. त्यांचं जाणं म्हणजे या क्षेत्राने आपला एक आधारस्तंभ गमावला आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
अलका कुबल यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement