Weather Alert: कुठं रेड, तर कुठं ऑरेंज अलर्ट, पश्चिम महाराष्ट्राचं टेन्शन वाढवणारं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather alert: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत धो धो पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर असून पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत पावसाने कहर केला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात महापुराने जनजीवन विस्कळीत झाले. अशातच आता पुन्हा चिंता वाढवणारी बातमी आहे. आज 28 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने पाचही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 28 सप्टेंबर रोजीचा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
शनिवारी सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस इतके घसरले. तसेच वादळी वाऱ्यासह 55 मिलिमीटर पाऊस कोसळला. पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. साताऱ्यास विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस इतके नोंदवले. आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 26 अंशावर राहील. पुढील 24 तास कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असून जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. कोल्हापूर घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर राहणार असून याठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे.
advertisement
सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा सुरूच आहेत. शनिवारी उत्तर सोलापूर 51.3 मिलीमीटर, दक्षिण सोलापूर 50.1, बार्शी 38.8, अक्कलकोट 52.4, मोहोळ 47.9, माढा 56.2, करमाळा 54, पंढरपूर 55.9, सांगोला 64.6, माळशिरस 65.2, मंगळवेढा 40.4 मिलिमीटर इतका पाऊस झाला. अशातच सीना आणि भीमा नदीच्या पात्रामध्ये लाखात विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी आणखी वाढत असून यामुळे पूरग्रस्त नागरिकांची चिंता वाढत आहे. आज, 28 सप्टेंबर रोजी विजांसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
पुढील 72 तास राज्यात पावसाचे वातावरण कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांना 28 सप्टेंबर रोजी विजांसह पावसाची शक्यता असून सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.