याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 'एमआयडीसी'ने 9 सप्टेंबर रोजी पाणीपट्टीत वाढ झाल्याचा निर्णय जाहीर केला. पाणीपट्टीत प्रति घनमीटर म्हणजेच 1 हजार लिटरसाठी 1 रुपयापासून 28.75 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. औद्योगिक क्षेत्र आणि बाहेरील औद्योगिक ग्राहकांसाठी प्रति घनमीटर 2.75 रुपये, औद्योगिक क्षेत्र आणि बाहेरील पाणी कच्चा माल म्हणून वापरणाऱ्या ग्राहकांसाठी प्रतिघनमीटर 28 रुपये आणि औद्योगिक क्षेत्र आणि बाहेरील घरगुती ग्राहकांसाठी प्रति घनमीटर 1 रुपया वाढ करण्यात आली आहे.
advertisement
Bhama Askhed Water Project : पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीप्रश्न कायम; भामा-आसखेड योजनेचा नेमका तिढा काय?
पुण्यातील एमआयडीसीतील मुख्य अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीने 2013 पासून पाणीपट्टीत वाढ केली नव्हती. जलसंपदा विभागाकडून पाणीपट्टीत झालेली वाढ आणि विजेचा वाढलेला खर्च यामुळे आता एमआयडीसीने देखील पाणीपट्टीत वाढ केली आहे. पाणीपट्टीचा सुधारित दर 1 सप्टेंबरपासून लागू झालेला आहे.
उद्योजकांनी मात्र, या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. एमआयडीसीने वाढवलेली पाणीपट्टी अवास्तव आहे. उद्योगांना विश्वासात न घेता तीन ते चार पटींनी अचानक वाढ करण्यात आली आहे. याचा उद्योगांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, असं उद्योजक म्हणाले आहेत.