TRENDING:

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: 10th- 12th पास असाल तर मिरा- भाईंदर महानगरपालिकेत नोकरीची संधी, 358 जागांसाठी मेगाभरती; इथे करा अर्ज

Last Updated:

गेल्या काही दिवसांपूर्वीच मिरा- भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर नोकरीची माहिती समोर आली होती. 358 जागांसाठी अर्ज भरण्याची तारीख 22 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात असाल तर, ही तुमच्यासाठी फार मोठी संधी आहे. मिरा- भाईंदर महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या जागांसाठी भरती केली जाणार आहे. सध्याच्या रोजगाराच्या काळामध्ये तरूणांसाठी ही फार मोठी रोजगाराची संधी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मिरा- भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर नोकरीची माहिती समोर आली होती. 358 जागांसाठी अर्ज भरण्याची तारीख 22 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. भरतीसंबंधित सर्व माहिती तुम्हाला https://mbmc.gov.in/en/recruitment या वेबसाईटवर मिळेल. नक्की कोणकोणत्या पदांसाठी मिरा- भाईंदर महानगरपालिकेमध्ये भरती आहे, जाणून घेऊया...
News18
News18
advertisement

पुण्यात उभारली जलमय द्वारका, मंडळाचा आगळावेगळा देखावा !

गेल्या काही दिवसांपूर्वीच, मिरा भाईंदर महानगरपालिकेने विविध विभागांतील 358 रिक्त जागा भरण्यासाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून परीक्षा घेतली जाईल. या भरतीसाठी 22 ऑगस्ट 2025 पासून अर्ज करणे सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे. या भरतीमध्ये लिपिक टंकलेखक, ज्युनियर इंजिनियर, क्लर्क टायपिस्ट, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत), सर्वेक्षक, प्लंबर, सर्वेअर, फिटर, पंप ऑपरेटरसह इतर पदांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रता असणाऱ्या आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

तरुण शेतकऱ्याने केली 900 झाडांची लागवड, पालटलं नशीब, वर्षाला लाखात कमाई, Video

या भरतीसाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. प्रत्येक पदासाठी पात्रता निकष आणि वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या जागा गट क अंतर्गत असून थेट भरती द्वारे भरल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाचे शुल्क श्रेणीनुसार वेगवेगळे आहेत. खुल्या प्रवर्गासाठीच्या अर्जाचे शुल्क 1000 इतके आहे. पण, मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गाचे शुल्क 900 इतके आहे. जर तुम्ही माजी सैनिक असाल तर तुम्हाला अर्ज शुल्क माफ असेल. भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वांसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे आहे. तर जास्तीत जास्त म्हणजे कमाल वयोमर्यादा 38 आहे. तर, ओबीसी प्रवर्ग आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 आहे. वयोमर्यादेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात पाहू शकता.

advertisement

ठाणे पालिसांची मोठी कारवाई, तब्बल 2,38,87,950 रुपयांचे अमली पदार्थ जप्त

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

परीक्षेच्या अंदाजे 7 दिवस आधी पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होईल. तर, परीक्षेची तारीख मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. जागांसाठी आरक्षण धोरण सरकारी नियमांनुसार असेल. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि इतर श्रेणींसाठी आरक्षण टक्केवारी निश्चित केली आहे. महिला, खेळाडू, माजी सैनिक आणि इतर श्रेणींसाठी आरक्षण देखील लागू असेल. प्रत्येक पदासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. काही अभियांत्रिकीच्या पदांसाठी त्या- त्या अभ्यासक्रमाची पदवी आवश्यक आहे, तर काही पदांसाछी दहावी, बारावी आणि पदवीची अट आहे. तर, काही पदांसाठी त्या- त्या क्षेत्रातील अनुभवही आवश्यक आहे. सर्व पदांची शैक्षणिक पात्रता भरतीच्या जाहिरातीत दिली आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्हाला जाहिरातीची लिंक देत आहोत, त्यावरून तुम्ही अधिकाधिक माहिती जाणून घेऊ शकता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: 10th- 12th पास असाल तर मिरा- भाईंदर महानगरपालिकेत नोकरीची संधी, 358 जागांसाठी मेगाभरती; इथे करा अर्ज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल