याच जत्रेत आमदार रोहित पवार यांची कन्या आनंदिता पवार हिने ‘अंडीज टी-शर्ट’ या नावाने एक आगळा- वेगळा स्टॉल उभारला असून, तो विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. शाळकरी वयोगटातील मुलांनी आपल्या सुट्टीच्या दिवसांत स्वतः तयार केलेले सुमारे 250 प्रकारचे हँडमेड, कस्टमाइज्ड टी- शर्ट आणि उटणे या स्टॉलवर विक्रीस उपलब्ध आहेत. या उपक्रमातून मिळणारा संपूर्ण निधी धर्मदाय पशु सेवा केंद्राला देण्यात येणार आहे.
advertisement
आनंदिता पवार हिने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. याआधी जमा झालेल्या निधीतून रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना निवारा मिळवून देण्यासाठी पशु सेवा केंद्राला मदत करण्यात आली आहे. यंदा देखील त्याच उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सात मित्र-मैत्रिणींनी मिळून हे टी-शर्ट तयार केले असून, त्यासाठी किमान दहा दिवसांचा कालावधी लागला आहे. एक टी- शर्ट सुमारे 600 रुपयांना विक्रीस असून, हे टी-शर्ट मुख्यत्वे लहान मुलांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. या उपक्रमातून अंदाजे दीड लाख रुपयांचा निधी जमा होतो तो सगळा निधी पशु सेवा केंद्राला दिला जातो.
भीमथडी जत्रेच्या माध्यमातून केवळ खरेदी-विक्रीच नव्हे, तर समाजभान, दानशीलता आणि उद्योजकतेची मूल्ये रुजवली जात असल्याचे आनंदिताच्या उपक्रमातून दिसून येत आहे.