ठाण्यात तीन तीन जीआर काढण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्यात चाललंय काय हे कळत नाही आहे.सुरुवातीला परिवहन मंत्र्यांच्या (प्रताप सरनाईक) आदेशाने जीआर आला. 31 डिसेंबर पर्यंत अवजड वाहनांना ठाण्यात बंदी घालण्यात आली.विशेष म्हणजे ही मागणी कुठल्याही ठाणेकरांनी केली नव्हती.पण त्यांना वाटलं हे करायला हवं त्यांनी ते केलं. तसेच घोडबंदरचे आमदार तेच आहेत त्यांनी जर तिथले रस्ते सुधारले असते ही गोष्ट करायला लागली नसती, असा टोला अविनाश जाधव यांनी प्रताप सरनाईक यांना लगावला.
advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरा जीआर काढला. रात्री बारा वाजता बैठक घेऊन ठाण्याचे ट्राफिक रद्द होणार असा जीआर काढला.आज तो देखील जीआर रद्द झाला. बारा ते सहा अवजड वाहन रात्री ठाण्यात येथील त्याच्यानंतर येणार नाही परंतु त्याचा परिणाम असा झाला ठाण्यातली ट्राफिक कमी झाली पण पालघर पर्यंत ट्रॅफिक गेली भिवंडी शहापूर पर्यंत ट्राफिक गेली आणि या सगळ्यात एका लहानशा चिमुरडीला आपला जीव गमवा लागला आता याचा दोषी कोण? माननीय उपमुख्यमंत्री का प्रशासन कुठलाही विचार न करता तुम्ही धपाधप जीआर काढता, असे अविनाश जाधव म्हणाले आहेत.
आज परत जिल्हाधिकारी कार्यालयाने तिसरा जीआर काढला.पहिले दोन जीआर बरोबर नव्हते म्हणून तिसरा जीआर काढला.सकाळी 5 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 11 या दरम्यान ठाण्यामध्ये अवजड वाहन येणार नाहीत असा जीआर आहे.तुम्ही जर अकरा वाजता अवजड वाहने ठाण्यात सोडली तर बाराच्या दरम्यान ठाण्यात शाळा सुटल्या जातात त्यातून शाळेत जाणारी मुले व येणारी मुलं ही त्या ट्राफिक मध्ये अडकणार नाही का? असा सवाल देखील अविनाश जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.
मनोर वाडा रस्ता जर यांनी केला असता ही वेळ आली नसती, त्यांनी वसई भिवंडी रस्ता जर केला असता तर ही वेळ आली नसती, घोडबंदर चा रस्ता जरी व्यवस्थित केला असता तरी ट्राफिक थोडी फास्ट झाली असती तरी आजही वेळ नसते.कामाचे फक्त टेंडर काढायचे आणि त्यातून पैसे खायचे त्या कामाचं पुढे काय होतं ते पाहायचं नाही, अशी टीका अविनाश जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर केली.
उपमुख्यमंत्र्यांना प्रोटोकॉल असतो रस्ते मोकळे केले जातात त्यांना काय कळणार.एक दिवस त्यांनी स्वतःची गाडी काढावी आणि एकटे जावो मग लोक काय तडफडतात ना हे त्यांना कळेल, असेही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.