Amravati News: ‘..आणि Alexa आली झेडपी शाळेत', अमरावतीच्या ग्रामीण शाळेत अभिनव प्रयोग

Last Updated:

ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण अधिक आकर्षक आणि संवादात्मक करण्यासाठी 'आली अलेक्सा शाळेला' या नावाने उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

+
Alexa

Alexa Doll

अमरावती: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण अधिक आकर्षक आणि संवादात्मक करण्यासाठी 'आली अलेक्सा शाळेला' या नावाने उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आता जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अलेक्सा डॉलच्या माध्यमातून डिजिटल शिक्षणाचा अनुभव घेता येणार आहे. हा उपक्रम सर्वात आधी दाभा येथील शाळेत असणारे शिक्षक अंकुश गावंडे यांनी सुरू केला होता. त्यांच्या प्रेरणेतून आता हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
पी. एम. श्री उच्च प्राथमिक शाळा, दाभा येथील सहाय्यक शिक्षक अंकुश गावंडे यांनी लोकल18 शी चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, मी हा उपक्रम स्वखर्चाने माझ्या शाळेत राबविला आहे. माझ्या या उपक्रमाची दखल सगळ्यांनी घेतली. सगळ्यांना तो उपक्रम आवडल्याने आता राज्यभरात राबविण्याचा विचार सुरू आहे. या उपक्रमात अलेक्सा डॉलच्या साहाय्याने मुलांना विविध शैक्षणिक विषयांवर प्रश्न विचारता येतात व तात्काळ उत्तरं मिळतात. संवादात्मक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढते, सामान्य ज्ञान वृद्धिंगत होते आणि ग्रामीण भागातील मुलांनाही डिजिटल तंत्रज्ञानाचा स्पर्श मिळतो. तसेच मुलं, शिक्षक आणि पालक यांच्यात शैक्षणिक संवाद अधिक प्रभावीपणे साधला जातो, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
पुढाकार आणि सहयोग
हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आला आहे. यासाठी ICICI बँकेच्या CSR निधीतून जिल्ह्यातील शाळांना अलेक्सा डॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दाभा (ता. नांदगाव खंडेश्वर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून या संकल्पनेची सुरुवात झाली. प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
advertisement
शिक्षक दिनी 5 अलेक्सा डॉलचे वाटप
5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त 'निपुण भारत अभियानात’ अव्वल ठरलेल्या चांदसुरा, फॉरेस्ट मालूर, दहेन्द्री, वाठोडा आणि पिंपळखुटा मोठा या पाच शाळांना अलेक्सा डॉल आणि व्हर्च्युअल रियालिटी (VR) युनिटचे वितरण करण्यात आले. हा विशेष सोहळा विभागीय आयुक्त आणि CEO यांच्या हस्ते पार पडला.
उपक्रमाचा परिणाम
या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शिक्षण साधनांविषयी उत्सुकता निर्माण होणार आहे. प्रश्न विचारण्याची आणि उत्तर शोधण्याची क्षमता विकसित होईल, तसेच आत्मविश्वास, जिज्ञासा आणि ज्ञानाची पातळी वाढेल. ग्रामीण शाळा देखील स्मार्ट एज्युकेशनच्या दिशेने वेगाने वाटचाल करतील.
advertisement
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी अधिक जवळीक साधता यावी. त्यांच्या इंग्रजी संवादकौशल्यात प्रगती व्हावी. कुतूहल वाढून नवे प्रयोग करण्याची प्रेरणा मिळावी आणि तंत्रज्ञानाबाबतची भीती दूर व्हावी. यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. हा संपूर्ण उपक्रम आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर निधीतून साकारला जात आहे. ‘निपुण’ उपक्रमातील कामगिरी व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे आता केवळ 50 शाळांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या शाळांना हे साहित्य पुरवल्या जाणार आहे, असे संजिता महापात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Amravati News: ‘..आणि Alexa आली झेडपी शाळेत', अमरावतीच्या ग्रामीण शाळेत अभिनव प्रयोग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement