मिळालेल्या माहितीनुसार, कामोठे शहरातील एका सलूनमध्ये एक महिला काम करायची. ती अनेक महिन्यांपासून या सलूनमध्ये काम करायची पण तिला तिचा पगार दिला जात नव्हता.त्यामुळे तिने सलून मालकाकडे पगाराची मागणी केली होती. पण दिवाळीच्या तोंडावर महिलेला पगार देण्याऐवजी सलून मालकाने तिला शिविगाळ केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर महिलेने या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत मागितली होती.
advertisement
महिलेने कामोठे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्या महिलेला सोबत घेऊन थेट संबंधित सलूनमध्ये धडक दिली होती. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून संबंधित घटनेबाबत सलून चालकाला जाब विचारला होता. पण सलून चालकाने या स्पष्ट नकार दिला होता.त्यानंतर सलून चालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे.
संबंधित महिला कामगार काही महिन्यांपासून कामोठे येथील एका सलूनमध्ये काम करत होती.मात्र तिला पगार देण्यात आला नव्हता.अनेकदा सांगूनही वेतन न मिळाल्याने त्या महिलेनं कामोठे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी सलून गाठत मालकाला चोप दिला आहे.
या दरम्यान, उपस्थित साक्षीदारांच्या माहितीनुसार सलून चालकाने उलट त्या महिलेलाच अयोग्य भाषेत शिवीगाळ केली. त्यावर संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या पद्धतीने त्याला चोप दिला. काही वेळातच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान मनेसेच्या या दणक्यानंतर संबंधित कामगार महिलेला सलून चालकाने पगार देण्याची तयारी दर्शवली आहे.त्यामुळे महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे.