काळ्या रंगाचे कपडे का टाळावेत?
प्रसिद्ध ज्योतिषाचार्य आदित्य जोशी गुरुजी यांच्या मते, भाऊबीजच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्तू हाताळू नयेत. कारण काळा रंग हा राहू, केतू आणि शनी या ग्रहांचा संकेत मानला जातो. या ग्रहांचा प्रभाव मनुष्याच्या जीवनात अडथळे, दुःख किंवा अंधाराचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या शुभ दिवशी अशा रंगांचा वापर टाळावा, असे गुरुजी सांगतात.
advertisement
औक्षणाचा शुभ मुहूर्त
गुरुजींनी सांगितल्यानुसार, भावाचे औक्षण शुभ मुहूर्तात करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या काळात औक्षण केल्यास भावाला दीर्घायुष्य, मार्कंडेय ऋषींचा आशीर्वाद आणि सप्त चिरंजीवांचा कृपाशिर्वाद मिळतो.
भाऊबीज 2025 साठी शुभ मुहूर्त
सकाळी 10:51 ते दुपारी 3:00 जर या वेळेत औक्षण शक्य नसेल, तर संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेतही औक्षण करता येईल.
औक्षणाच्या ताटात काय असावं?
औक्षण करताना ताटामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू असणे आवश्यक आहे यात तुपाचा दिवा, सुवर्ण अंगठी, सुपारी, सुट्टे पैसे, अक्षता, हळद-कुंकू असावं.