Kuberdev Astrology: धनदेवता कुबेराची या राशींवर असते कृपादृष्टी; दिवाळीत दोन्ही हातांनी करणार धनवर्षा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Kuberdev Astrology: आज येथे आम्ही तुम्हाला अशा काही राशींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर कुबेर देवाची कृपा नेहमी राहते. कुबेराच्या कृपेनं या लोकांना सर्व भौतिक सुखे प्राप्त होतात आणि हे लोक अतिशय धनवान होतात. या राशींविषयी जाणून घेऊया...
मुंबई : ज्योतिषशास्त्रात १२ राशी आणि २७ नक्षत्रांचा उल्लेख आढळतो. तसेच या राशींवर कोणत्या ना कोणत्या ग्रह आणि देवतेचे आधिपत्य असते. म्हणजेच, त्यांचा संबंध विशिष्ट देव आणि ग्रहांशी मानला जातो. त्यामुळे या राशींशी संबंधित लोकांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्व एकमेकांपेक्षा वेगळे असते.
आज येथे आम्ही तुम्हाला अशा काही राशींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर कुबेर देवाची कृपा नेहमी राहते. कुबेराच्या कृपेनं या लोकांना सर्व भौतिक सुखे प्राप्त होतात आणि हे लोक अतिशय धनवान होतात. या राशींविषयी जाणून घेऊया...
धनु रास - धनु राशीवर कुबेरदेव मेहेरबान असतात. कुबेरदेव या राशीच्या लोकांना खूप धनवान बनवतात. त्याचबरोबर हे लोक खूप मेहनती आणि प्रामाणिक देखील असतात. कुबेराच्या कृपेनं त्यांना सर्व भौतिक सुखे मिळतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर हे लोक सहज मात करतात. या राशीचे लोक ज्या कामाला हात घालतात, त्यात त्यांना यश नक्की मिळतं.
advertisement
वृषभ रास - या राशीवरही कुबेराचा विशेष आशीर्वाद असतो. या लोकांना जीवनात सर्व भौतिक सुखे प्राप्त होतात. तसेच, हे लोक पैशांची बचत करण्यात माहीर असतात. हे लोक आलिशान जीवन (Luxury Life) जगतात. समाजात त्यांचे खूप नाव असते. कुटुंबातील प्रत्येकाचे ते लाडके असतात. त्यांना पद-प्रतिष्ठा प्राप्त होते. हे लोक दूरदृष्टी असलेले आणि मेहनती असतात.
advertisement
तूळ रास - तूळ रास देखील भाग्यवान राशींपैकी एक मानली जाते, कारण या राशीच्या लोकांवरही कुबेराची विशेष कृपा असते. या राशीच्या लोकांना धन-दौलताची कमतरता राहत नाही. तसेच, कुबेराच्या कृपंने हे लोक जीवनात खूप मान-सन्मान मिळवतात. भगवान कुबेरांच्या आशीर्वादानं ते पैसे कमावण्यात यशस्वी होतात. प्रत्येक लहान संधीतून पैसे कमविण्याची क्षमता या राशीच्या लोकांमध्ये असते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 5:20 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Kuberdev Astrology: धनदेवता कुबेराची या राशींवर असते कृपादृष्टी; दिवाळीत दोन्ही हातांनी करणार धनवर्षा