'माझं व्यक्तिमत्त्व चिवड्यासारखं...' ऐन दिवळीत हे काय म्हणाली कमळी! सांगितलं फराळा मागचं गोड नातं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
झी मराठीवरील कमळी मालिकेतील विजया बाबर दिवाळी कुटुंबासोबत खास पद्धतीने साजरी करते. व्यक्तिमत्त्व चिवड्यासारखं असल्याचं ही म्हणाली.
दिवाळी हा एक असा सण आहे जो कुटुंब, प्रेम आणि एकत्र येण्याचा उत्सव असतो. दिवाळीचा गोडवा तेव्हाच वाढतो, जेव्हा तो आपल्या प्रियजनांसोबत साजरा करता येतो. प्रत्येकाची दिवाळी साजरी करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकजण आपल्या परीनं दिवाळी साजरी करतो. झी मराठीवरील 'कमळी' मालिकेतील कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर दिवाळीचा आनंद आपल्या खास पद्धतीने लुटते. माझं व्यक्तिमत्त्व चिवड्यासारखं आहे असं कमळी म्हणजे विजया बाबर म्हणाली आहे.
शूटिंग मध्ये बिझी असूनही विजया या सणासाठी वेळ काढते. यावर्षी तिला अधिक सुट्ट्या मिळणार असल्याने तिचा उत्साह अधिकच वाढलाय. विजया दिवाळीच्या काही गोष्टी शेयर करत म्हणाली, "माझं व्यक्तिमत्त्व चिवड्यासारखं आहे ज्यात शेंगदाणे, खोबरं, तिखट, साखरेचा गोडपणा, सगळं काही असतं. अगदी तसेच माझ्यात अनेक गुण आहेत. माझ्या कुटुंबाचं म्हणणं मी एक छोट्या बॉंम्ब सारखी आहे आणि मी छोटा पॅकेट, मोठा धमाका आहे!" या गोड आणि रंगीत सणात ती तिच्या कुटुंबासोबत एकत्र येते."
advertisement
दिवाळीतील खास आठवण सांगत विजया म्हणाली, "लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपूर्ण सोसायटीतील मंडळी एकत्र येऊन फटाके लावणे आणि नंतर सर्व तरुण मंडळी मिळून जेवायला जाणे. ही परंपरा अजूनही न चुकता पाळली जाते. लहानपणी मी खूप खट्याळ होते. दिवाळीत मी फटाके फोडायचे, पण आता मात्र फक्त शगुनाची फुलबाजी लावते आणि सण साजरा करते. दिवाळीपूर्व तयारीत सहभागी होणं हे माझ्यासाठी फार आनंददायक असतं. फराळ करताना सगळं कुटुंब एकत्र येणं हा एक वेगळाच आनंद असतो. आता शुटिंगमुळे वेळ मिळत नाही, पण मी आईला सांगून ठेवले आहे की कमीत कमी एक पदार्थ तरी ठेव, जो मी सर्वांसोबत बसून बनवू शकेन."
advertisement
विजया पुढे म्हणाली, "दिवाळी म्हणजे एकत्र येणं, आठवणींचा गोडवा आणि प्रेमाचं वातावरण. काम कितीही असलं तरी कुटुंबासाठी वेळ काढायलाच हवा. दिवाळी साजरी करताना पर्यावरणाची काळजी घ्या, प्रेम वाटा आणि जुन्या आठवणींना नव्या रंगात सजवा."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझं व्यक्तिमत्त्व चिवड्यासारखं...' ऐन दिवळीत हे काय म्हणाली कमळी! सांगितलं फराळा मागचं गोड नातं