Pune News : लॅपटॉप असलेली बॅग रिक्षात विसरली, गुगल पेच्या माध्यमातून विद्यार्थ्याला शोधलं, रिक्षाचालकाच्या माणुसकीची पुण्यात चर्चा

Last Updated:

आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचे उदाहरण पाहायला मिळणं दुर्मिळ झालं आहे. मात्र, लोणी काळभोर परिसरातील एका रिक्षाचालकाने माणुसकीचं सुंदर दर्शन घडवलं आहे.

रिक्षाचालक 
रिक्षाचालक 
पुणे : आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचे उदाहरण पाहायला मिळणं दुर्मिळ झालं आहे. मात्र, लोणी काळभोर परिसरातील एका रिक्षाचालकाने माणुसकीचं सुंदर दर्शन घडवलं आहे. मोहन गणपती चंदनशिवे या रिक्षाचालकाने एका विद्यार्थ्याचा लॅपटॉप असलेली बॅग स्वतःहून शोधून परत देत एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं.
एम.आय.टी. कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा अर्थ पिंपरे हा विद्यार्थी बुधवारी संध्याकाळी एम.आय.टी. कॉर्नरवरून वाघोलीकडे जात होता. प्रवास संपल्यानंतर तो घाईत रिक्षेतून उतरला, मात्र त्याची लॅपटॉप असलेली बॅग रिक्षेतच राहिली. काही वेळाने लक्षात येताच अर्थ परत आला, पण रिक्षेचा क्रमांक लक्षात नसल्यामुळे तो असहाय झाला. तात्काळ त्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कृष्णा बाबर आणि त्यांच्या टीमने सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली.
advertisement
दरम्यान, विद्यार्थ्याच्या नशिबात एक आनंदाची बातमी होती. रिक्षाचालक मोहन चंदनशिवे यांनी स्वतःहून अर्थशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, अर्थने गुगल पे द्वारे रिक्षाचं भाडं दिलं होतं. त्या ट्रान्झॅक्शन आयडीवरून त्यांनी विद्यार्थ्याचं नाव शोधलं आणि मित्राच्या मदतीने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट शोधून त्याला मेसेज पाठवला. अर्थने मेसेज पाहताच आनंदाने धावत जाऊन आपली बॅग परत घेतली. लॅपटॉप आणि इतर वस्तू पूर्णपणे सुरक्षित अवस्थेत होत्या.
advertisement
या प्रामाणिक आणि हृदयस्पर्शी कृतीसाठी लोणी काळभोर पोलिसांनी मोहन चंदनशिवे यांचा विशेष सन्मान केला. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. मोहन चंदनशिवे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा दृष्टिकोन समाजासाठी एक आदर्श आहे, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितलं.
अनेकदा चोरी, फसवणूक आणि बेइमानीच्या घटनांनी समाजातील विश्वास डळमळीत होतो. मात्र, मोहन चंदनशिवे यांनी दाखवलेलं प्रामाणिकपण आणि जबाबदारीची भावना समाजात अजूनही चांगुलपणाचं बीज जिवंत असल्याचं सिद्ध करतं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : लॅपटॉप असलेली बॅग रिक्षात विसरली, गुगल पेच्या माध्यमातून विद्यार्थ्याला शोधलं, रिक्षाचालकाच्या माणुसकीची पुण्यात चर्चा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement