शेतकरी मालक सोडून गेला हे त्याला मान्यचं नव्हतं, 9 दिवसांपासून तो चितेजवळ बसलेला! अख्खं गाव हळहळलं

Last Updated:

वडवळ गावातील शेतकरी तानाजी पवार यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्या स्मशानभूमीत तानाजी यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले त्याच स्मनशानभूमीत गेल्या 9 दिवसांपासून अखंडपणे श्वान बसून राहिले.

+
मालकाचा
title=मालकाचा मृत्यू; तरीही 9 दिवसांपासून स्मशानभूमीत वाट बघत बसले श्वान 

/>

मालकाचा मृत्यू; तरीही 9 दिवसांपासून स्मशानभूमीत वाट बघत बसले श्वान 

सोलापूर: श्वान म्हणजे माणसाचा सर्वात विश्वासू मित्र असे म्हटले जातं. जितका प्रेम माणूस माणसावर करत नाही तितके प्रेम आणि विश्वास श्वान माणसावर करत असतो. प्रेम आणि निष्ठा दाखवणारी एक हृदयस्पर्शी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. वडवळ गावातील शेतकरी तानाजी पवार यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्या स्मशानभूमीत तानाजी यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले त्याच स्मनशानभूमीत गेल्या 9 दिवसांपासून अखंडपणे श्वान बसून राहत असून मालकावर असलेले प्रेम स्पष्ट होत आहे.
एखाद्या श्वानाला माणसाने जर जीव लावला तर जिवाच्या पलीकडे ही तो श्वान आपल्या मालकाला जीव लावतो, अशीच काहीशी घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडवळ गावातील घडली आहे. शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांची दोन एकर शेती पत्नी मुलासह त्या गावात राहत होते. 7 ऑक्टोबर म्हणजेच दहा दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने तानाजी पवार यांचे निधन झाले. तानाजी पवार यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत तानाजी पवार यांच्या पार्थिवावर शोक व्यक्त करण्यासाठी परिवारासह नातेवाईक, गावातील लोक वडवळ येथील स्मशानभूमीत गेले.
advertisement
तेव्हा सर्वांनी पाहिलं की ज्या कुत्र्याला तानाजी पवार जीवाला जीव लावत होते, तो श्वान गेल्या 9 दिवसांपासून त्याच स्मशानभूमीत हताशपणे बसून राहिला होता. हे चित्र पाहून पवार यांच्या परिवारातील लोकांचे अश्रू अनावर झाले. पवार यांच्या नातेवाईकांनी त्या श्वानाला परत आपल्या घरी घेऊन गेले परंतु तो श्वान घरी न थांबता त्याच स्मशानभूमीत बसून राहत आहे. श्वान त्यांच्या मालकाप्रती असलेल्या निष्ठेसाठी ओळखले जातात हे त्याचे मानवी कुटुंबासोबत बनलेले बंधन असते. मालकासाठी असलेली निष्ठा प्रेम पाहून या श्वानाची वडवळ येथील नागरिकांच्या तोंडून कौतुकाचे शब्द निघत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेतकरी मालक सोडून गेला हे त्याला मान्यचं नव्हतं, 9 दिवसांपासून तो चितेजवळ बसलेला! अख्खं गाव हळहळलं
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement