Success story : बत्ताशे कसे तयार होतात, हे कधी पाहिलंय का? सोलापूरच्या संजयचं फॅक्टरी, महिन्याला इतकी कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
दिवाळीनिमित्त सोलापूर शहरातील मित्र नगर येथे राहणारे संजय नामदेव निर्मळ बत्ताशे बनवण्याचं काम करत आहेत. पारंपरिक पद्धतीने साखरेच्या पाकापासून बत्ताशे बनवण्याचा वारसा जपला आहे.
सोलापूर : दिवाळीनिमित्त सोलापूर शहरातील मित्र नगर येथे राहणारे संजय नामदेव निर्मळ बत्ताशे बनवण्याचं काम करत आहेत. पारंपरिक पद्धतीने साखरेच्या पाकापासून बत्ताशे बनवण्याचा वारसा जपला आहे. साखरेपासून बत्ताशे कसे तयार केले जातात? हा व्यवसाय ते कधीपासून करत आहेत? या संदर्भात अधिक माहिती संजय निर्मळ यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
सोलापूर शहरातील मित्र नगर, शेळगी येथे राहणारे संजय नामदेव निर्मळ गेल्या तीन पिढ्यांपासून बत्ताशे बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. जुन्या चवीचा आणि श्रद्धेचा वारसा आजही संजय निर्मळ यांनी पुढे नेण्याचं काम करत आहेत. बत्ताशे हा गोड पदार्थ नसून महाराष्ट्राच्या पारंपरिक गोड संस्कृतीचं प्रतीक आहे.
advertisement
बत्ताशे बनवण्यासाठी पहिला साखरेला मोठ्या कढईमध्ये टाकले जाते. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आगीवर जवळपास 20 ते 25 मिनिटे उकळून घेतले जाते आणि एका साखळीच्या सहाय्याने उकळून घेतलेली साखरेची कढई एका साखळीच्या सहाय्याने अडकवली जाते. उकडलेल्या साखरेच्या पाकापासून चमच्याच्या साह्याने हे बत्ताशे तयार केले जातात. 50 किलो साखरेपासून 50 किलो बत्ताशे तयार केले जातात. दररोज 2 क्विंटल बत्ताशे साखरेच्या पाकापासून बनवले जातात. तर बत्ताशेला बाजारात 70 रुपये किलो दराने विक्री केले जाते. तर या व्यवसायातून ते महिन्याला 2 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
advertisement
संजय निर्मळ यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला बत्ताशे बनवण्याचा व्यवसाय असून निर्मळ यांची ही तिसरी पिढी आहे. सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव येथे देखील संजय निर्मळ यांचे बत्ताशे विक्रीसाठी पाठवले जातात. प्रत्येक सणासुदीला आणि मंदिरामध्ये बत्तासे हा प्रसाद म्हणून दिला जातो. पण आज रेडिमेट मिठाई आणि पॅकबंद उत्पादनांच्या वाढत्या स्पर्धेमुळे या पारंपरिक व्यवसायावर परिणाम जरी होत असला तरीदेखील पारंपरिक पद्धतीने बत्ताशे बनवण्याचा व्यवसाय पुढे नेण्याचं काम संजय निर्मळ करत आहेत.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 17, 2025 5:50 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success story : बत्ताशे कसे तयार होतात, हे कधी पाहिलंय का? सोलापूरच्या संजयचं फॅक्टरी, महिन्याला इतकी कमाई