Manoj Jarange : 'फडणवीसांना हा गेम लक्षात आला पाहिजे...', भुजबळांच्या सभेआधीच मनोज जरांगेचा खळबळजनक आरोप
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बीडमध्ये आता थोड्यात वेळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार महासभेला सूरूवात होणार आहे. या सभेला सुरूवात होण्याआधीच मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर टीका केली आहे.
Manoj Jarnage on Chhagan Bhujbal : बीडमध्ये आता थोड्यात वेळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार महासभेला सूरूवात होणार आहे. या सभेला सुरूवात होण्याआधीच मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर टीका केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळ यांचा गेल लक्षात आला पाहिजे,कारण ते त्यांच्यावर मागुन वार करतायत,असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
मनोज जरांगे न्यूज 18 लोकमतशी बोलत होते.यावेळी मनोज जरांगे यांनी सुरूवातीला भूजबळांच्या बीडमधील मोर्चाची खिल्ली उडवली. ओबीसींचा नाही तर तो ठराविक जातीचा मोर्चा आहे,त्यात तुम्हाला ठराविक जात दिसतील, त्यामुळे हा ओबीसींचा मोर्चा नसल्याचे म्हणत मनोज जरांगे यांनी मोर्चाची खिल्ली उडवली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या 2 सप्टेंबरच्या जीआरला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. या विरोधावर विचारले असता मनोज जरांगे म्हणाले, ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आला पाहिजे. कारण यामागे खूप मोठा गेम असण्याची शक्यता आहे. तो (छगन भुजबळ) देवेंद्र फडणवीसांसमोर पुढे पुढे करतो, गुलु गुलु गप्पा हाणतो. बोलायच दाखवायच आणि मोठे पण सांगायच. त्यासोबत समाज दाखवायचा आणि त्यांच्यावर (देवेंद्र फडणवीस) वार करायचा असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला आहे.
advertisement
सरकारवर जिव्हारी वार झाला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज किती करता येईल याचा पूरेपूर प्रयत्न सूरू असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आम्हाला अजिबात शंका नाही आहे.मराठवाड्यातील गरीब लेकरांच भविष्य घडावं, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त होऊ नये,यासाठी त्यांनी जीआर काढला होता,असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.तसेच देवेंद्र फडणवीस आता मराठ्यांच्या लेकरा बाळांच आयुष्य उद्ध्वस्त होईल असं कोणतंही पाऊल उचलणार नाहीत, आणि यांना (छगन भूजबळ) तयार आहेत, असा विश्वास जरांगेंनी यावेळी व्यक्त केला.
advertisement
फडणवीसांवर आम्ही विश्वास ठेवला आहे,नादी लावणाऱ्यातले आम्ही नाही आहोत.तुम्हाल वाटतं फक्त कुणी चौथी नापास आहे,पण आमच्या ज्ञानाप्रमाणे आम्ही समाजाला मोठं करू इतपत अक्कल आमच्यात आहे. आणि कोण कोण आमच्यावर काय काय डाव करतोय ती पण अक्कल आमच्याकडे आहे,असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
October 17, 2025 5:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange : 'फडणवीसांना हा गेम लक्षात आला पाहिजे...', भुजबळांच्या सभेआधीच मनोज जरांगेचा खळबळजनक आरोप