Pune News: एक चित्र पूरग्रस्तांसाठी! पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये "एक हात मदतीचा"

Last Updated:

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पुणे आर्टिस्ट ग्रुपच्या वतीने "एक चित्र पूरग्रस्तांसाठी" चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून जमा झालेल्या निधीतून शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

+
पुण्यातील

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चित्रप्रदर्शन..

मागील काही दिवसांत मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह इतर गोष्टींच्या अतोनात नुकसान झाले. महाराष्ट्रभरातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पीडित शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी "एक चित्र पूरग्रस्तांसाठी" या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि कला प्रेम याचा सुंदर संगम साधत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पुणे आर्टिस्ट ग्रुपच्या वतीने "एक चित्र पूरग्रस्तांसाठी" या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमात महाराष्ट्रभरातील जवळपास 300 चित्रकारांनी सहभाग नोंदवला असून, रेखाटलेली चित्रे अगदी मोफत दरात दिलेली आहेत. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना सुरेंद्र कोडपणे पाटील यांनी दिली.
advertisement
आयोजक सुरेंद्र कोडपणे यांनी सांगितले की,महाराष्ट्रातील "वाटा खारीचा सहभाग चित्रकारांचा"या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.मराठवाड्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपटाचा महाराष्ट्रभरातून जवळपास 300 मातब्बर चित्रकारांनी आपले चित्र हे अगदी मोफत दरात दिलेले आहेत. या चित्र विक्रीतून जमा झालेल्या निधीतून शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत देण्यात येणार आहे.
advertisement
या प्रदर्शनात विविध शैलीच्या चित्रांचा समावेश असून, निसर्ग,समाज, लोकजीवन, संस्कृती आणि मानवी संघर्षाचे चित्रकलाकारांनी आपल्या कॅनवास वर साकारलेले आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रदर्शन दिनांक 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर यादरम्यान सर्वसामान्यांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आणि चित्रांची खरेदी करून, पीडित शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्चाला हातभार लावावा अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune News: एक चित्र पूरग्रस्तांसाठी! पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये "एक हात मदतीचा"
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement