Dhanteras 2025: धनत्रयोदशीला खरेदी केलेला झाडू घरी आणल्यानंतर या चुका टाळा; लक्ष्मी आल्या पावली माघारी..!
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dhanteras 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी घरात नवीन झाडू आणणं खूप शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी केल्यानं माता लक्ष्मीची कृपा टिकून राहते, असे मानले जाते.
मुंबई : धनत्रयोदशीपासून खऱ्या अर्थानं दिवाळीचा सण सुरू होतो असं मानलं जातं. यावर्षी धनत्रयोदशी शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी घरात नवीन झाडू आणणं खूप शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी केल्यानं माता लक्ष्मीची कृपा टिकून राहते, असे मानले जाते.
परंतु, कोणत्याही शुभ दिवशी झाडू खरेदी करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे आपण त्याचा वापर कसा करतो आणि घरात झाडू कुठे व कसा ठेवतो. घरात चुकीच्या पद्धतीनं ठेवलेला झाडू गरीबी आणि दरिद्रता आणतो, असं म्हटलं जातं.
झाडू लपवून ठेवा - वास्तू शास्त्रानुसार, झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा. झाडू नेहमी दारामागे किंवा पलंगाखाली लपवून ठेवावा. झाडू उघड्या जागेत ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि पैशाच्या प्रवाहावर वाईट परिणाम होतो.
advertisement
झाडू सरळ उभा करू नका - झाडू चुकूनही कधी सरळ उभा करून ठेवू नये. घरात उभा झाडू ठेवल्यानं अस्थिरता आणि आर्थिक समस्या वाढतात. घरात उभा झाडू ठेवल्यास धनाची देवी माता लक्ष्मीची कृपा थांबते, असे मानले जाते. झाडूशी संबंधित ही छोटीशी चूक नकारात्मकता आणि गरिबीचे कारण ठरू शकते.
संध्याकाळच्या वेळी झाडू मारणे - झाडू ही आपल्या दैनंदिन कामात वापरली जाणारी वस्तू आहे. पण तिचा योग्य वापर जीवन आनंदी बनवू शकतो. जेव्हा देवी लक्ष्मी वैकुंठातून खाली आल्या, तेव्हा त्यांनी ती जागा स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग केला होता, अशी मान्यता आहे. तेव्हापासून देवी लक्ष्मीला झाडूचे प्रतीक मानले जाते.
advertisement
झाडू कधी मारावा आणि कधी नाही, याबाबत वास्तूमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. वास्तूनुसार, घरात चुकूनही संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नये. सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास माता लक्ष्मी नाराज होऊन घरातून निघून जाते. सायंकाळ आणि रात्रीच्या वेळी घरात झाडू लावणे वर्जित आहे.
advertisement
झाडू ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे?
वास्तू शास्त्रानुसार, घराच्या दक्षिण-पश्चिम (नैऋत्य), उत्तर-पश्चिम (वायव्य) आणि पश्चिम दिशेला झाडू ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिशेला ठेवलेला झाडू आर्थिक आघाडीवर संपन्नता आणि स्थिरता आणतो. या दिशेला ठेवलेलो झाडू खर्च कमी करतो आणि आर्थिक स्थिती सुधारतो, असे म्हणतात. स्वयंपाकघरातील वस्तूंना झाडूचा स्पर्श होऊ नये याची काळजी घ्या. तसेच, झाडू घराच्या मुख्य दरवाजासमोर ठेवण्याची चूक करू नका.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 4:14 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला खरेदी केलेला झाडू घरी आणल्यानंतर या चुका टाळा; लक्ष्मी आल्या पावली माघारी..!