Snake Fact : साप विषारी असतो, पण सापाच्या अंड्यामध्ये ही विष असतं का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भीती वाटत असतानाही लोकांना सापांबद्दल प्रचंड कुतूहल असतं. विशेषतः त्याच्या अंड्यांबद्दल. काहींना प्रश्न पडतो की सापाची अंडी खाऊ शकतो का? ती विषारी असतात का? आणि ती माणसासाठी धोकादायक आहेत का?
साप हा असा प्राणी आहे ज्याचं नाव ऐकूनच अनेकांच्या अंगावर काटा येतो. जंगलात, शेतात किंवा घराजवळ साप दिसला तर लोक घाबरून पळ काढतात. त्याच्या विषारी दंशामुळे माणसाचा जीवसुद्धा जाऊ शकतो, त्यामुळे साप म्हणजे भीतीचं दुसरं नाव. पण गंमत अशी की, भीती वाटत असतानाही लोकांना सापांबद्दल प्रचंड कुतूहल असतं. विशेषतः त्याच्या अंड्यांबद्दल. काहींना प्रश्न पडतो की सापाची अंडी खाऊ शकतो का? ती विषारी असतात का? आणि ती माणसासाठी धोकादायक आहेत का?
advertisement
तज्ज्ञांच्या मते, सापाची अंडी खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. सापाच्या अंड्यांमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया किंवा परजीवी असू शकतात. विशेषत: साल्मोनेला बॅक्टेरिया या अंड्यांमध्ये आढळतात, जे शरीरात गेल्यास पोटदुखी, अतिसार, उलट्या, ताप यांसारख्या त्रासांना कारणीभूत ठरू शकतात. काही लोकांना या अंड्यांमुळे अॅलर्जी सुद्धा होऊ शकते. जसे त्वचेवर पुरळ, खाज, श्वास घेण्यास त्रास इत्यादी.
advertisement
advertisement
मात्र, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की भारतात साप हा वन्यजीव संरक्षणाखालील प्राणी आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार कोणत्याही सापाला इजा करणे, पकडणे किंवा त्याची अंडी घेणे हे गुन्हा मानले जाते आणि त्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सापाबद्दल कुतूहल ठेवणं ठीक आहे, पण त्याच्या आयुष्यात हस्तक्षेप करणं चुकीचं ठरतं.
advertisement