Diwali 2025 : नेहमीचा पॅटर्न सोडा, या दिवाळीत साडीपासून शिवा हटके ट्रेडिंग ड्रेस, खास टिप्सचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
दिवाळी म्हटलं की आनंद, रोषणाई, फराळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन कपडे. प्रत्येकजण या दिवसात काहीतरी खास आणि आकर्षक परिधान करतो.
मुंबई : दिवाळी म्हटलं की आनंद, रोषणाई, फराळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन कपडे. प्रत्येकजण या दिवसात काहीतरी खास आणि आकर्षक परिधान करतो. विशेषतः महिलांसाठी सण म्हटलं की साडी किंवा त्या साड्यांपासून शिवलेले ड्रेस हा एक हमखास पर्याय असतो.
पण अनेकदा वर्षानुवर्षे त्याच पॅटर्नचे साडीपासून तयार केलेले ड्रेस आपण घालत असतो. सेम ब्लाऊज कट, सेम फ्रॉक स्टाईल किंवा पारंपरिक पॅटर्न. मग या दिवाळीत काहीतरी वेगळं, हटके आणि फॅशनेबल करून पाहायचं का? याच विषयावर फॅशन डिझायनर विनया विचारे यांनी काही खास टिप्स आणि कल्पना शेअर केल्या आहेत.
advertisement
साडीपासून तयार होणाऱ्या हटके ड्रेस आयडिया
विनया विचारे सांगतात की पारंपरिक साडी ही फक्त ओढणीपुरती मर्यादित नाही, तर तिच्यापासून अनेक सुंदर आणि ट्रेंडिंग ड्रेस तयार करता येतात. काही उदाहरणे अशा प्रकारची
1) गरारा सेट: साडीच्या बॉर्डरचा वापर करून घेरदार गरारा आणि शॉर्ट कुर्ता शिवता येतो.
2) पेपलम कुर्ता आणि लेहेंगा: पैठणी किंवा सिल्क साड्यांपासून पेपलम टॉप आणि लेहेंगा तयार करून क्लासिक लूक देता येतो.
advertisement
3) कॉर्ड सेट: हलक्या वजनाच्या साड्यांपासून दोन पीस कॉर्ड सेट्स तयार करून स्टायलिश पण कम्फर्टेबल फेस्टिव्ह लूक मिळतो.
4) जॅकेट ड्रेस: पैठणी किंवा बनारसी साडीपासून तयार केलेलं जॅकेट आणि प्लेन ड्रेसचं कॉम्बिनेशन सध्या ट्रेंडिंग आहे.
5) मम्मी-डॉटर ट्विनिंग: त्याच साडीपासून आई आणि मुलीसाठी एकसारखे ड्रेस तयार केले, तर दिवाळीच्या फोटोंना एक वेगळाच टच मिळतो.
advertisement
स्टायलिंग टिप्स
विनया सांगतात की, साडीपासून ड्रेस शिवताना थोडी क्रिएटिव्हिटी आणि फॅब्रिक मिक्सिंग केलं, तर तो ड्रेस अगदी वेगळा दिसतो. मटका गळा, लेस बॉर्डर, कॉन्ट्रास्ट स्लीव्ह्ज, किंवा पारंपरिक बॉर्डरचा वापर करून आधुनिक टच देता येतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 4:09 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali 2025 : नेहमीचा पॅटर्न सोडा, या दिवाळीत साडीपासून शिवा हटके ट्रेडिंग ड्रेस, खास टिप्सचा Video