कार्यक्रमानंतर राज ठाकरे खाली उतरू लागले, पण त्यावेळीही आरोही त्यांना सतत हाक देत होती. तिच्या निरागस आवाजाने राज ठाकरे यांचे लक्ष वेधले. कार्यकर्त्यांनी गर्दी बाजूला करत त्यांना पुढे जाण्यास सांगितले. मात्र, राज ठाकरे पायऱ्यांवरच थांबले. त्यांनी आपल्यासोबतच्या सुरक्षारक्षकांना आणि कार्यकर्त्यांना सांगून आरोहीला आपल्याजवळ बोलावून घेतले.
आरोही त्यांच्याजवळ आल्यावर त्यांनी तिच्याशी गप्पा मारल्या आणि तिच्यासोबत एक छान फोटोही काढला. हा क्षण पाहून आरोहीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. राज ठाकरे यांच्या या कृतीमुळे उपस्थितांनीही त्यांचे कौतुक केले.
advertisement
याच कार्यक्रमात राज ठाकरे यांनी अंबरनाथ जिल्हा मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखेला सर्वप्रथम भेट दिली. त्यांनी शाखेच्या रजिस्टरमध्ये सही करत आपल्या खास 'ठाकरे स्टाईल'मध्ये शुभेच्छाही दिल्या. राज ठाकरे यांच्या या वागण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे.