कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. तर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाच्या उंचीवरून केवळ भाजपकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप देखील खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय, त्याला कृष्णा पाणी लवादाने मंजुरी देखील दिलीये. लवादाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रसह कोणत्याही राज्याने उंची वाढण्यास विरोध केला नसल्याचा खुलासा केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर दिल्याने आता खळबळ उडाली आहे.
advertisement
अलमट्टीबाबत केवळ भाजपकडून राजकारण : विशाल पाटील
यावरून खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत अलमट्टीबाबत केवळ भाजपकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे. अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातलाय. पाच मीटरने उंची वाढवल्यास अलमट्टीची पाणी पातळी शिरोळ बंधाऱ्यापर्यंत येणार असल्याचा दावा जलतज्ञांनी केला आहे. यामुळे सांगली व कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे पावसाळ्यात जलमय होऊ शकतात. याबाबत संसदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा विरोध असून तांत्रिक समिती नियुक्त करण्याची मागणी केली.
महाराष्ट्राचा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला विरोध नाही
त्याला उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी मात्र महाराष्ट्रसह कोणत्याच राज्याने अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत विरोध करण्याचा प्रस्ताव दिलेला नाही, असा खळबळजनक दावा केलाय. खरंतर महाराष्ट्राकडून उंची वाढवण्यास विरोध होणे अपेक्षित होता. परंतु तो झाला नाही.
