TRENDING:

MPSC मध्ये एकेकाळच्या ३ धडाकेबाज अधिकाऱ्यांची नियुक्ती, कोण आहेत सदस्य? वाचा संपूर्ण माहिती

Last Updated:

MPSC New Member: शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर तीन नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर (MPSC) राजीव निवतरकर, दिलीप भुजबळ-पाटील आणि महेंद्र वारभुवन या तीन नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, राजीव निवतकर आणि महेंद्र वारभुवन यांनी आज सदस्य पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली .
एमीएससी
एमीएससी
advertisement

आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील मुख्यालयात हा शपथविधी सोहळा पार पडला. या प्रसंगी आयोगाचे सदस्य अभय वाघ आणि सतिश देशपांडे यांच्यासह आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात, सहसचिव तथा परीक्षा नियंत्रक सरीता बांधेकर-देशमुख, उपसचिव मा पां जाधव हे उपस्थित होते.

राज्य लोकसेवा आयोगाच्या नवनियुक्त सदस्यांची माहिती

१) राजीव निवतकर IAS 2010

हे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी असून यांनी विविध महत्वाच्या पदांवर कामगिरी केली आहे.

advertisement

संचालक :आपत्ती व्यवस्थापन.

सहसचिव: मुख्य सचिव कार्यालय.

मुंबई जिल्हाधिकारी (कलेक्टर, मुंबई शहर)

आयुक्त: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन

२) महेंद्र ब. वारभुवन (M. B. Warbhuvan) IAS 2010

हे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांनी प्रशासनात पार पाडलेल्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे

सचिव: महाराष्ट्र राज्य कृषी परिषद पुणे,

मुख्य कार्यकारी अधिकारी: जिल्हा परिषद पालघर

advertisement

सहसचिव: सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,

अतिरिक्त आदिवासी आयुक्त :ठाणे विभाग,

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोनं महागलंय, दिवाळीत घ्या हटके अन् स्टायलिश ज्वेलरी, किंमत फक्त 145 रुपयांपासून
सर्व पहा

आयुक्त: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) तथा सचिव प्रवेश नियामक प्राधिकरण, मुंबई

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MPSC मध्ये एकेकाळच्या ३ धडाकेबाज अधिकाऱ्यांची नियुक्ती, कोण आहेत सदस्य? वाचा संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल