मिळालेल्या माहितीनुसार,निष्पाप चिमुरड्यावर नायगावच्या चिंचोटी येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार सूरू होते. पण डॉक्टरांनी मुलाच्या कुटुंबियांनी पुढील उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता.त्यानुसार कुटुंबिय मुलाला घेऊन अँम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने निघाले होते.या दरम्यान ते वाहतुक कोंडीत अडकले होते.
खरं तर सकाळपासूनच मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी सुरू होती.संध्याकाळनंतर ही वाहतूक कोंडी आणखीणच वाढली होती. त्यामुळे महामार्गावर तब्बल 20 ते 25 किलोमिटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याच वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकली होती.या ॲम्ब्युलन्सला पुढे जाण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता. कारण मुंबईकडून गुजरात कडे जाणाऱ्या तसेच गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या अशा दोन्ही लेनवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.त्यामुळे ही ॲम्ब्यूलन्स मधोमध अडकून पडली होती.
advertisement
या सगळ्या घडामोडी दरम्यान ॲम्ब्युलन्समध्ये असलेल्या चिमुरड्याची तब्येत खालावत चालली होती. त्याला तत्काळ मुंबईच्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. पण वाहतूक कोंडीमुळे अॅम्ब्युलन्स चालकापासून चिमुरड्याचे कुटुंबिय हतबल होते.त्यांना अशापरिस्थितीत काहीच करता येत नव्हते.त्यामुळे जवळजवळ पाच तास कुटुंब वाहतुक कोंडीत अडकलं होतं. त्यानंतर झालं असं की चिमुरड्याने अचानक प्रतिसाद देण्यास बंद केलं होतं. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी अॅम्ब्युलन्समधून उतरून नजीकच्या ससूनवघर गावातील छोट्या रुग्णालयात त्याला दाखल केले होते.यावेळी डॉक्टरांनी चिमुरड्याला मृत घोषित केले होते.त्यामुळे पालकाच्या डोळ्यादेखत त्याचा मृत्यू झाला होता.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान मुंबई अहमदाबाद मार्गावरील घोडबंदर येथील वाहतुक कोंडी मोठी समस्या आहे. दररोज या महामार्गावर अनेकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. पण अद्याप ही समस्या सुटली आहे. त्यामुळे या घटनेला आता जबाबदार कोण? असा सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे.या घटनेने नागरीकांमधून संताप व्यक्त होतोय.