TRENDING:

Shiv Sena UBT BMC: ठाकरेंच्या उमेदवारानं मतदानात घोळ केला अन् सत्ताच गमावली, मुंबईत उलथापालथ, भाजपचाच गेम?

Last Updated:

BMC Shiv Sena UBT election: मुंबई महापालिका प्रभाग समिती निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने १७ पैकी ११ जागा जिंकत वर्चस्व राखले. ठाकरे गटाच्या दोन नगरसेवकांच्या चुकीच्या मतदानामुळे भाजपचा विजय सोपा झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील १७ प्रभाग समित्यांच्या (२४ वॉर्ड) अध्यक्षपदाचा हायव्होल्टेज रणसंग्राम अखेर पूर्ण झाला असून, यात सत्ताधारी महायुतीने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. एकूण १७ समित्यांपैकी ११ समित्यांवर भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार निवडून आले आहेत. उर्वरित ६ जागांवर विरोधी पक्षांनी बाजी मारली असली, तरी एका समितीच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार नगरसेवकाने मतदानात केलेल्या चुकीमुळे भाजपच्या नगरसेविका विजयी झाल्या. या 'तांत्रिक' चुकीवरून राजकीय चर्चांना उधाण आले असून मातोश्री दखल घेणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरेंच्या उमेदवारानं मतदानात घोळ केला अन् सत्ताच गमावली, मुंबईत उलथापालथ, भाजपचाच गेम?
ठाकरेंच्या उमेदवारानं मतदानात घोळ केला अन् सत्ताच गमावली, मुंबईत उलथापालथ, भाजपचाच गेम?
advertisement

प्रभाग समिती निवडणुकीचा निकाल काय?

सोमवारी झालेल्या अखेरच्या टप्प्यातील पाच निवडणुकांनंतर मुंबईतील प्रभाग समित्यांचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्या नेतृत्वातील महायुतीने ११ प्रभाग समित्यांवर विजय मिळवला आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाला २ समित्यांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसनेही दोन समित्यांवर विजय मिळाला. तर, मनसे आणि एमआयएमने प्रत्येकी एक प्रभाग समितीवर विजय मिळवला.

advertisement

एस आणि टी प्रभाग समितीत नाट्यमय घडामोड...

सोमवारच्या निवडणुकीत 'एस' आणि 'टी' प्रभाग समितीची निवडणूक सर्वाधिक चर्चेची ठरली. या समितीत महायुती आणि ठाकरे गट पुरस्कृत मित्रपक्षांकडे प्रत्येकी १०-१० असे समसमान संख्याबळ होते. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी ठाकरे गटाचे नगरसेवक सुरेश शिंदे आणि नगरसेविका दीपमाला बढे यांनी चक्क भाजप उमेदवार साक्षी दळवी यांच्या कॉलममध्ये स्वाक्षरी केली. दोन अनुभवी नगरसेवकांनी केलेल्या या तांत्रिक चुकीमुळे ही दोन्ही मते अवैध ठरवण्यात आली आणि भाजपचा विजय सुकर झाला. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली असती तर ईश्वरी चिठ्ठीद्वारे निकाल लागला असता. मात्र, ठाकरेंच्या नगरसेवकांनी केलेल्या चुकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

advertisement

एम-पूर्व मध्ये एमआयएमचा विजय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

'एम-पूर्व' प्रभाग समितीमध्ये एमआयएमच्या खैरनुसा हुसेन यांनी ८ मते मिळवत शिवसेनेच्या प्रज्ञा सदाफुले (५ मते) यांचा पराभव केला. 'एम-पश्चिम'मध्येही चुरस पाहायला मिळाली. सोमवारी पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT BMC: ठाकरेंच्या उमेदवारानं मतदानात घोळ केला अन् सत्ताच गमावली, मुंबईत उलथापालथ, भाजपचाच गेम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल