केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुंबई-गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन दिली आहे. एप्रिल 2026 आधी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती लोकसभेत नितीन गडकरी यांनी दिली आहे. लोकसभेत ठाकरे सेनेचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नावर गडकरींनी हे उत्तर दिलं आहे. त्यामुळं मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आता एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
advertisement
काय म्हणाले नितीन गडकरी?
नितीन गडकरी म्हणाले, मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्प 2009 पासून प्रकल्प रेंगाळला आहे. यात जमीन संपादनाचा मुख्य अडथळा होता. अनेक कंत्राटदार बदलण्यात आले, अनेकांवर कारवाई झाली. आतापर्यंत 89 टक्के काम झाले झाले असून एप्रिल 2026 पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल. प्रकल्प खूप रेंगाळला आहे हे मान्य करतो.
कोकणवासीय गेल्या 17 वर्षांपासून कमालीचे चिंतेत
अपूर्ण मुंबई- गोवा महामार्गामुळे कोकणवासीय गेल्या 17 वर्षांपासून कमालीचे चिंतेत आहे. तो त्यांच्यासाठी चिंतेचं कारण ठरलं आहे. रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे वाहनांची वेगमर्यादा मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते आणि वाहनचालक करतात. राज्य सरकारने मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्याची अंतिम मुदत एप्रिल 2026 पर्यंत वाढवली आहे. तितक्या वेळेत तरी हा महामार्ग पूर्ण होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.एप्रिल 2026 पर्यंत महामार्ग पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे, तर कदाचित कोकणवासीयांचा शिमग्याला नाही पण किमान गणपतीत जाण्याचा मार्ग अधिकच सुखकर होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
