याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार या व्यक्तीला 15 दिवस सोमवार ते शुक्रवार दररोज तीन तास करावं लागणार आहे. संबंधित व्यक्तीला हॉस्पिटलचा कॉमन एरिया स्वच्छ करावा लागेल आणि फरशी देखील पुसावी लागेल. जर हॉस्पिटल प्रशासनाने त्याला स्वच्छतेऐवजी दुसरं काम दिलं तर त्याला ते देखील करावं लागेल. 15 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हॉस्पिटल कोर्टात रजिस्ट्रारकडे अहवाल सादर करेल. या व्यक्तीने काम पूर्ण केलं नाही तर त्याला न्यायालयाच्या अवमानाच्या कारवाईचा सामना करावा लागेल.
advertisement
हे प्रकरण एका टीव्ही मालिकेशी संबंधित आहे. या मालिकेत 46 वर्षांचा पुरूष आणि 19 वर्षांच्या मुलीची प्रेमकथा दाखवली जात आहे. कोर्टाने शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीने या मालिकेविरुद्ध एफआयआर दाखल केली होता. टीव्ही मालिका प्रसारित करणाऱ्या वाहिनीने याविरुद्ध हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. विशेष म्हणजे एफआयआर दाखल करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख सतत बदलून कोर्टाची दिशाभूल करण्याचा देखील प्रयत्न केला होता.