TRENDING:

स्टुडिओच्या खिडक्यांना सेन्सर लावून पोरांना डांबलं, छर्ऱ्याच्या बंदुकीतून पोलिसांवर गोळीबार करणारा रोहित आर्य कोण?

Last Updated:

पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यवर गोळीबार केला. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईतल्या पवईत भर दुपारी ओलीसनाट्याचा थरार रंगला. आरए नावाच्या स्टुडिओत एका माथेफिरून 17 मुलांना ओलीस ठेवलं. वेबसिरिजच्या ऑडिशनसाठी ही मुलं पवईत आली होती. दुपारी दीड वाजून गेल्यानंतरही मुलं जेवण्यासाठी बाहेर न आल्यानं पालकांना संशय आला. तब्बल दोन तासांनी आरोपी रोहित आर्यनं एक व्हिडिओ जारी केला. यामध्ये मुलांना जाळून टाकण्याची धमकी त्यानं दिली. तत्परता दाखवत स्थानिकांच्या मदतीनं मुंबई पोलिस इमारतीच्या बाथरूममध्ये शिरले. त्यानं पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात तो जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र काहीवेळानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
News18
News18
advertisement

आरोपी रोहित आर्य याने छर्ऱ्याच्या बंदुकीतून पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी क्रॉस फायरिंग करत एक राउंडही फायर केला होता. एवढच नाही तर रोहितने स्टुडिओच्या सर्व खिडक्यांना सेन्सर लावले होते . त्यामुळे पोलिसांनी बाथरुमच्या खिडक्यांमधून प्रवेश करत १७ मुलांची सुटका केली. दरम्यान, पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यवर गोळीबार केला.

advertisement

कोण आहे रोहित आर्य?

  • रोहीत आर्य हा नागपूरच्या शाळेचा प्राध्यपक
  • या व्यक्तीने नागपूरमध्ये स्वच्छचा मोहीम राबवली होती
  • त्यावेळी १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता
  • त्यावेळीच्या शालेयमंत्री दिपक केसरकर यांनी हा निधी त्याला त्यावेळी दिला नाही
  • त्याने स्वखर्चाने ६० ते ७० लाख रुपये खर्च केला
  • हा निधी न मिळाल्याने आर्या आंदोलन करत होता
  • advertisement

  • त्याने याआधी आझाद मैदानात देखील केलं होतं आंदोलन

पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी केला गोळीबार

दरम्यान या आरोपीकडे एअरगन आणि केमिकल सापडल्याचं समोर आलं होतं. मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर झाला असून आरोपीने पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी, आरोपीच्या छातीत गोळी लागली होती. पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यवर गोळीबार केला होता.

advertisement

संकल्पनेचे श्रेय  हिसकावून घेतले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पवना नदीचं आरोग्य धोक्यात, नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास, कारण काय?
सर्व पहा

रोहित आर्य याने २०२३ मध्ये महाराष्ट्रात स्वच्छता मॉनिटर संकल्पना सुरू केली होती. एका प्रादेशिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांच्याविरुद्ध बाहेर निषेध करताना दिसले. त्यांनी सांगितले की त्यांना थकबाकी देण्यात आली नाही आणि या संकल्पनेचे श्रेय त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्टुडिओच्या खिडक्यांना सेन्सर लावून पोरांना डांबलं, छर्ऱ्याच्या बंदुकीतून पोलिसांवर गोळीबार करणारा रोहित आर्य कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल