याबाबात मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट खिडकीवर रांगेत उभं राहून तिकीट काढण्याच्या त्रासातून प्रवाशांची सुटका व्हावी, या हेतूने रेल्वेने 2016मध्ये यूटीएस अॅप सुरू केलं. या अॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर आणि प्लॅटफॉर्मवरील विशिष्ट क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढता येतं होतं. या सुविधेमुळे अनेक प्रवाशांनी समाधान देखील व्यक्त केलं होतं. मात्र, दिवसेंदिवस या सेवेचा गैरवापर वाढू लागला आहे.
advertisement
Mumbai News: मुंबईत ईदची सुट्टी 5 नव्हे 8 सप्टेंबरला, राज्यात कधी? सोमवारी काय बंद राहणार?
अनेक जण तिकीट तपासनीस दिसल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढतात. तिकीट तपासनीस नसतील विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता क्यूआर कोड स्कॅनच्या माध्यमातून होणारी तिकीटविक्री बंद करण्यात आली आहे. जुलै महिन्यात याबाबत मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाला पत्र लिहिलं होतं. त्याला मंजुरी मिळाल्याने गुरुवारपासून ही सेवा बंद करण्यात आली.
नवीन पर्यायावर विचार सुरू
रेल्वे स्टेशनवर तिकीट खिडकी परिसरात डिजिटल स्क्रीन बसवून बदलणारे (डायनॅमिक) क्यूआर कोड कार्यान्वित करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. त्यासाठी सर्व रेल्वे स्टेशन्सवर स्क्रीनची सोय करावी लागणार आहे. ही नवीन व्यवस्था सुरू होईपर्यंत क्यूआर कोड स्कॅन करून होणारी तिकीटविक्री बंदच राहील, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.